Home /News /maharashtra /

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंची बाजी, पंकजा मुंडेंना मोठा धक्का

बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंची बाजी, पंकजा मुंडेंना मोठा धक्का

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नेतृत्वाखाली आठपैकी पाच जागेवर शेतकरी विकास पॅनलला विजय मिळाला आहे. हा पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) मोठा धक्का समजला जात आहे.

    बीड 21 मार्च : मुंडे बहीण-भावाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे बहुचर्चित बीड जिल्हा मध्यवर्ती बँकच्या निवडणुकीची (Beed District Central Co-operative Bank Election) मतमोजणी पार पडली आहे. निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकल्यानंतरच चित्र स्पष्ट झाले होते. आज झालेल्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचा शेतकरी विकास पॅनल विजयी झाल्याचे समोर आले आहे. यात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नेतृत्वाखाली आठपैकी पाच जागेवर शेतकरी विकास पॅनलला विजय मिळाला आहे. हा पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) मोठा धक्का समजला जात आहे. बीड जिल्हा बँकेच्या आठ जागेसाठी शनिवारी मतदान झाले होते. 58 टक्के मतदान झाले तर मतदान प्रक्रियेत काही ठिकाणी गोंधळ झाला होता. बोगस मतदान झाल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. तसेच या कारणावरुन परळीत भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणदेखील झालं होतं. या पार्श्वभूमीवर आज मतमोजणीला सकाळी 9 वाजेपासून बीड जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात सुरुवात झाली. यात 8 पैकी 6 जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारली. 1)इतर शेती संस्था मतदार संघ अमोल आंधळे यांना 223 मते मिळाली. ते 212 मतांनी विजयी झाले तर त्यांच्याविरोधात धनराज राजभाऊ मुंडे यांना 8 मते मिळाली. 2) कृषी प्रक्रिया मतदार संघात भाऊसाहेब नाटकर 41 मतांनी विजयी 3)पतसंस्था मतदार संघ- राजकिशोर पापा मोदी 93 मते घेऊन विजयी. गंगाधर आगे यांना 36 मते मिळाली. 4)जिल्हा बँकेच्या ओबीसी मतदार संघातून कल्याण आखाडे 716 मतं मिळवत विजयी 5) अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघात रवींद्र दळवी 720 मते मिळवून विजयी झाले तर एकूण मते 805 इतकी होती 6) जिल्हा बँकेच्या महिला राखीव मतदारसंघात सुशीला शिवाजी पवार यांना 234 मतं मिळाली. त्या विजयी झाल्या 7) कल्पना दिलीप शेळके यांचा 174 मते घेऊन उमेदवार विजय 8) परळी येथील प्रयागाबाई साबळे यांना केवळ 118 मते, बाद मतांची संख्या विजयी उमेदवार यांना पडलेल्या मतांपेक्षा अधिक आहे 9) जिल्हा बँक विमुक्त जाती जमाती मतदार संघ - सूर्यभान मुंडे विजयी इतक्या जागांवर विजय - महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनल-05 सुरेश धस गट भाजप - 01 शिवसेना क्षीरसागर गट - 01 अपक्ष - 01
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Beed news, Dhananjay munde, Pankaja munde

    पुढील बातम्या