बीडमध्ये आता पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमने-सामने, ऊसतोड मजुरांचा मुद्दा ठरला कारण

बीडमध्ये आता पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमने-सामने, ऊसतोड मजुरांचा मुद्दा ठरला कारण

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

बीड, 24 ऑक्टोबर : ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात फूट पडल्याचं चित्र आहे. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

ऊसतोड मजुरांचा संप मागे, असं म्हणत दर वाढ दिली नाही तरी कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे यांनी आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस यांनी 150 टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे बीडमध्ये भाजप पक्षाअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

अंबेजोगाई येथील आज कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात मोठी घोषणा केली. यावर क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, आमच्या ऊसतोड कामगारांना 150 टक्के, 100 टक्के, 70 टक्के वाढ नको तर कमीत कमी प्रति टनाला 21 रुपये वाढ द्या, असे आवाहन पवार साहेबांना केलं आहे. आमच्या ऊसतोड कामगारांना उद्या भगवान बाबांचे दर्शन घेऊन ऊसतोड करण्यासाठी कारखान्याला गाड्या भरण्याचे आदेश दिले आहेत.

पंकजा मुंडे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. आम्ही कधीही त्यांच्या आवाहनाला बळी पडणार नाही, अशी भूमिका घेत पुणे येथील 27 तारखेच्या बैठकीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन सुरेश धस यांनी केलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2020, 11:20 PM IST

ताज्या बातम्या