बीडमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीचा प्रकार उघड झाल्याने खळबळ, दोन अश्लील VIDEO झाले अपलोड

बीडमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीचा प्रकार उघड झाल्याने खळबळ, दोन अश्लील VIDEO झाले अपलोड

बीड जिल्ह्यातील गेवराई आणि परळीमध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 14 जानेवारी : बीड जिल्ह्यामध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन अश्लील व्हिडिओ एका साईटवर अपलोड झाल्याचे मुंबई सायबर क्राईमच्या लक्षात आलं. त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई आणि परळीमध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

दोन लहान मुलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बीड जिल्ह्यातून सोशल मीडियावर अपलोड झाल्याची बाब मुंबईच्या सायबर सेलच्या निदर्शनास आली होती. ही माहिती बीड पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर बीड पोलिसांनी परळी शहर पोलीस स्टेशन आणि गेवराई पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

सोशल मीडियावर अपलोड झालेल्या व्हिडिओतील दोन्ही पीडित मुले ही बीड जिल्ह्याच्या बाहेर आले असून त्यांचे व्हिडिओ परळी शहर आणि गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून सोशल साइटवर अपलोड झाले आहेत. हे व्हिडिओ बाहेरील व्यक्तीने अपलोड केले की यामागे एखादं रॅकेट आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

याआधीही समोर आले आहेत धक्कादायक प्रकार

'चाईल्ड पॉर्नोग्राफी'वर बंदी असताना सिडको, सातारा आणि छावणी परिसरात बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी व्हिडिओ लोड करणाऱ्या फेसबुक प्रोफाइलविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्लीतील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने पुढाकार शहरात प्रथमच ही कारवाई केली आहे.

गर्लफ्रेंडसमोर पगार विचारला म्हणून वैतागलेल्या तरुणाने थेट रॉडने केली मारहाण

बाल लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ एकाने फेसबुकसह इतर सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर दिल्लीच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी या किळसवाण्या प्रकाराबाबत 18 डिसेंबर 2019 रोजी कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्वच सायबर क्राईम पोलीस ठाण्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. 30 मार्च 2019 रोजी शहरातील सिडको हद्दीतून चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ तसेच डिसेंबर महिन्यात सातारा आणि फेसबुकवर लोड केल्याचे दिसून आले.

खंडणीसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, पुणे विद्यापीठ परिसरात फेकला मृतदेह

ज्या व्यक्तीने बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत तिच्या संगणकाच्या आयपी ॲड्रेस अथवा वापरलेल्या मोबाइल सिम कार्ड क्रमांकावरून सातारा, छावणी, आणि सिडको अशा संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 10:07 AM IST

ताज्या बातम्या