पोळ्याच्या सणाला बैलांच्या डोळ्यात पाणी, शेतकरी झाला दीनवाणी!

मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदील झालाय. वर्षभर गुरा ढोरांना जगवायचं कसं असा त्याच्यापुढे प्रश्न आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 06:47 PM IST

पोळ्याच्या सणाला बैलांच्या डोळ्यात पाणी, शेतकरी झाला दीनवाणी!

सुरेश जाधव, बीड 29 ऑगस्ट : वाळलेंल्या गवताला दात घासनारी जनावरं, कोरडया पडलेल्या विहिरी हे बीड जिल्ह्यातल्या दुष्काळाचं भिषण वास्तव आहे. जिवापाड जपलेल्या गुराढोरांना दुष्काळात खायला काय घालाव या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. ओलाचारा तर सोडाच पण वाळलाचारा सुध्दा उपलब्ध नाही. यामुळे जर पाऊस नाही आला तर बैलांना आणि गुरं ढोराना  सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बैल पोळ्याच्या सनावर बीड मध्ये दुष्काळाचे सावट असून शेतकरी हवालदील झालाय.

पोळा हा सण ग्रामीण भागातला सर्वात महत्त्वाचा सण असतो. वर्षभर राबणाऱ्या बैलाची त्या दिवशी पूजा केली जाते.मात्र दुष्काळामुळे सगळच बदललं अशी भावना बीड जिल्ह्यातील गुंदावाडी गावांतील शेख मंजूर यांनी व्यक्त केलीय. यांच्याकडे दोन बैल जोड्या आहेत. प्रत्येक वर्षी बैल पोळ्याला सजवून धजवुन बैलांना तयार करण्यासाठी तो आठ दिसावं राबत असतो. लुसलुशीत हिरवा चारा राखून ठेवत असतो यावर्षी मात्र पोळ्याच्या दिवशी  बैलजोडीला वाळली जुनी दोन वर्षांची वैरन टाकतांना त्यांना खूप वाईट वाटलं पण दुष्काळामुळे सर्वच हतबल आहेत असं सांगत पुढे कसं व्हायचं असा सवालही त्यांनी केलाय.

शाळेत बागडणाऱ्या किड्यांचा मुलांना चावा, 75 मुलं हॉस्पिटलमध्ये

गेल्या दहा वर्षा पासून हिऱ्यां आणि मोत्या या जोडीला त्यांनी तळहाताच्या फोंडा प्रमाणाने सांभाळलं. त्यानी काबाड कष्ट करताना माझी सोबत कधी सोडली नाही. शेतात राबणारा या बैलजोडीचे कृतज्ञता म्हणून पोळ्याच्या दिवशी त्याची मिरवणूक काढली जाते पूजा केली जाते. पण यावर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आहे. पाऊस आला नाही तर या माझ्या जोडीला काय खायला टाकू असा त्यांचा प्रश्न आहे. असं करण्यापेक्षा त्यांना कुंकू लावून सोडून देणार असं सांगताना हाडाचे शेतकरी असलेल्या बाळासाहेब कानडेच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

पुन्हा होणार राजकीय 'भूकंप', हे 5 दिग्गज नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

Loading...

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना दुसरीकडे चाऱ्याचाही प्रश्न आता निर्माण झालाय. पावसाळ्याचे अडीच महिने संपूनही पावसाने हजेरी न लावल्याने गुराढोरांना खूरटे वाळून गेलेले  गवतच फक्त आधार आहे. शेतकरी चिंतातुर आहे जर पाऊस नाही पडला तर जीवापाड जपलेली जोडी सोडून देण्याशिवाय त्यांना पर्याय नाही.

Ganesh Chaturthi 2019: गणेश स्थापना करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणं आवश्यक

होतं नव्हतं ते जळून गेले त्यामुळे यावर्षी पोळ्यावर विरजन पडणार आहे. मोठ्या थाटाने मिरवणाऱ्या सर्जा राजाला यावर्षी मात्र  दुष्काळाचे चटके सहन करावे लागणार आहे. बीडमधल्या प्रत्येक शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे बांधलेल्या गुरांच्या समोर टाकायला कुठून आणायचे यामुळे पोळ्याच्या सण होत असताना बळीराजाचे दुःख पाहून मुक्याजनावरांच्या डोळ्यात देखील पाणी आले. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...