बीड 05 मे: हातावर पोट असलेल्या मजुरांवर 45 दिवसाच्या लॉक डाऊन नंतर आर्थिक संकट आलं आहे. धुनी भांडी करून घर चालवणाऱ्या बीड शहरातील सीताबाई टाक यांना किराणा आणि औषधासाठी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं, अशीच परिस्थिती हातावर पोट असललेल्या अनेक मजुरांची आहे. बीड शहरात माळीवेश भागात राहणारे 60 वर्षीय काशिनाथ टाक हे आपल्या पत्नी सोबत राहतात. ते स्वतःकापड दुकानावर काम करतात तर पत्नी सीताबाई या धुणी भांडी करून संसाराला हातभार लावतात. त्यांना चार मुलीच आहेत. त्या सगळ्यांची लग्न झाली आहेत. काशीनाथ यांना दोन हार्ट अटॅक येऊन गेले आहेत. त्यात डायबेटीज आहे. औषधांसाठी महिन्याला मोठा खर्च लागतो.
लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून त्या दोघांचंही काम बंद आहे. काशिनाथराव घरातच आहेत. तीन घरची भांडी घासून सीताबाईंना महिन्या काठी 1200 रुपये मिळातात. त्यात घर भाडे आणि इतर खर्च निघणे मुश्किल झालंय.
यातच घरातील सगळा किराणाही संपला. गोळ्या औषधांसाठी पैसे नाहीत म्हणून सीताबाई यांनी मंगळसूत्र गहाण ठेवून 5 हजार रुपये व्याजाने घेतले. भांडी घासून येणाऱ्या पैशातून मंगळसूत्रं सोडवायचं जर निराधारची पगार आली तर सगळे पैसे देऊ असं सीताबाईंनी सांगितलं.
दारूला परवानगी देणाऱ्या सरकारने मॉर्निंग वॉकला मुभा द्यावी, पुण्यातून नवी मागणी
माझं काम बंद आहे. दुकान सुरू नाही. काम बंद तर पैसे नाही, शेवटी पत्नीनं किराण्यासाठी मंगळसूत्र ठेवून 5 हजार आणले मात्र मी काहीच करू शकत नाही कोरोनाने लई वाईट दिवस आणले अशी भावना काशीनाथ टाक यांनी व्यक्त केली.
पुणेकरांना मोठा दिलासा! सामान्यांनाही हे नियम पाळून मिळणार इंधन
कोरोनाशी दोन हात करताना आर्थिक संकट आलं. त्याचा मुकाबला कसा करायचा हा खूप मोठा प्रश्न हजारो कुटुंबा समोर आहे. हातचा रोजगार गेल्याने उपासमारी आणि उघड्यावरती येण्याची वेळ येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.