रावसाहेब दानवेंचे मंत्रिपद काढून घ्या, 'त्या' वादग्रस्त वक्तव्याचा सेनेकडून निषेध

रावसाहेब दानवेंचे मंत्रिपद काढून घ्या, 'त्या' वादग्रस्त वक्तव्याचा सेनेकडून निषेध

विधानसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

  • Share this:

विजय कमळे पाटील,(प्रतिनिधी)

जालना,1 नोव्हेंबर: भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्येसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा बजरंग सेनेकडून तिव्र निषेध व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवेंचे मंत्रिपद काढून घ्या, अशी मागणी बजरंग सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आपले पुत्र तथा भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांच्या प्रचारसभेतील या व्हिडिओमध्ये दानवे यांनी परिसरात दोन नंबरचे काम सुरू असल्याचे कबूल केले होते. व्हिडिओमध्ये मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचताना ते गो हत्येच्या निर्णयाबद्दलही बोलले. त्यासाठी बकरी ईदच्या वेळचा एक प्रसंग सांगतानाही ते दिसत आहेत. बकरी ईदच्या वेळी मुस्लिम समाजातील काही लोक आपल्याकडे कत्तलीवरील बंदीची तक्रार घेऊन आले होते. रावसाहेब दानवे असेपर्यंत काहीही बंद होणार नाही, असे मी तेव्हा त्यांना म्हणालो होतो, अशी आठवण ते मतदारांना देत आहेत. त्यांचा हाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, बजरंग सेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या साध्वी धर्मसिहनी गायत्रीदीदी मंडलिक यांनी अंबड तहसिलदारांना एक निवेदन देऊन रावसाहेब दानवे यांनी गोहत्येसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. दानवेंचे पद बरखास्त करण्याची मागणी केली. असे लोकं जर सत्तेत असतील तर हिंदूंना धोका असल्याचेही त्या म्हणाल्या.

गो हत्येबद्दल काहीही वादग्रस्त बोललो नाही: दानवे

​गो हत्येविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे. 'मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. व्हिडिओमध्ये छेडछाड करून खोडसाळपणे समाजमाध्यमावर चुकीचे वृत्त पसरवण्यात आल्याचा खुलासा दानवे यांनी केला आहे.

VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत, काय म्हणाले शरद पवार?

First published: November 1, 2019, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading