चिमुरडीचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन मद्यधुंद बापाने घातला गोंधळ, बलात्काराचा संशय

चिमुरडीचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन मद्यधुंद बापाने घातला गोंधळ, बलात्काराचा संशय

अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणात चिमुरडीवर बलात्कार झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,27 सप्टेंबर: दोन वर्षाच्या मुलीचा मृतदेह क्रांतीचौक सारख्या वर्दळीच्या रस्त्यावर ठेवून गोंधळ घालणार्‍या मद्यधुंद बापाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणात चिमुरडीवर बलात्कार झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे चिमुरडीच मृत्यू संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. पोलीस या प्रकरणात कसून चौकशी करत आहे. वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतरच मुलीवर बलात्कार झाला आहे काय, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कामगार शिवाजी भोसले, आपली पत्नी व चार मुलांसह इगतपुरीला जाण्यासाठी तीन-चार दिवसांपूर्वी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आले होते. चुकीने दौंडकडे जाणार्‍या रेल्वेत बसल्याचे राहुरी स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. राहुरी स्टेशनवर शिवाजी भोसले हे दोन वर्षाची मुलगी ऐश्‍वर्या आणि आणखी एका मुलासह उतरले. मात्र, गाडी सुरू झाल्यामुळे पत्नीला उतरता आले नाही. तिच्याकडेही एक लहान आपत्य आणि एक मुलगा राहिली.

शिवाजी भोसले याने दोन अपत्यासह राहुरी स्थानकावर रात्र काढली. सकाळी मुलगी ऐश्वर्या झोपेतून उठल्यानंतर आपल्या गुप्तांत वेदना होत असल्याचे सांगत रडू होती. त्याच दरम्यान, भोसलेची पत्नी आपल्या दोन मुलांसह राहुरी स्टेशनवर त्यांना भेटली. आपल्याला इगतपुरीला कामासाठी जाणे आवश्यक आहे. ऐश्‍वर्याचे दुखत असल्याने तिला घेऊन औरंगाबादला निघ, असे सांगून शिवाजी भोसले इगतपुरीकडे तर चार मुलांसह त्याची पत्नी मुकुंदवाडी येथील नातेवाईकाडे रवाना झाली. मुलीच्या आईने नातेवाईकांना घडलेली घटना सांगून मुलीचे गुप्तांग दुखत असल्याचे सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार गुरुवारी संध्याकाळी मुलीला घेऊन एका बाबाकडे जात असताना पीव्हीआर सिनेमागृहाजवळच मुलीचे निधन झाले. अशा परिस्थितीत मुलीचा मृतदेह आणि अन्य तीन मुलांना घेऊन महिला औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आली. अख्खी रात्र तिने त्याच अवस्थेत काढली. शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास तिचा नवरा शिवाजी भोसले रेल्वेस्टेशनवर आला. त्याने कुटुंबासह रिक्षात मृतदेह घेऊन मुकुंदवाडीकडे निघाला. मात्र, तो मद्यधुंद असल्यामुळे त्याने रिक्षात गोंधळ घातला. रिक्षाचालकाने क्रांती चौकात उतवले. भोसले याने मुलीचा मृतदेह चौकाच्या मधोमध ठेऊन प्रचंड गोंधळ घातला. त्यावेळी नागरिकांनी त्याला समज दिली. पण तो नागरिकांच्याच अंगावर धाऊन गेला. मात्र नागरिकांनी त्याला येथेच्च चोप दिला.

दरम्यान, पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवाजी भोसले याला ताब्यात घेतले आहे. मुलीवर बलात्कार झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट पोलिसांनी सांगितले.

लाकडाच्या ढिगाराखाली अडकला भलामोठा अजगर, सुटकेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 06:09 PM IST

ताज्या बातम्या