मुख्यमंत्र्यांना बुके देणं शिवसैनिकाला पडलं महाग, पालिकेने ठोठावला दंड

मुख्यमंत्र्यांना बुके देणं शिवसैनिकाला पडलं महाग, पालिकेने ठोठावला दंड

भेटायला येणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनाही आयुक्तांनी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या बुके आणि भेटवस्तुंमुळे दंड ठोठावला होता.

  • Share this:

औरंगाबाद10 जानेवारी : आपला लाडका नेता मुख्यमंत्री झाल्यावर त्याचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ असते. त्यात जर ते कार्यकर्ते शिवसैनिक असतील तर मग तो उत्साह आणखीच वाढतो. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करणं एका शिवसैनिकाला महागात पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या औरंगाबद दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. तर आज त्यांनी शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी पुष्पगुच्छ देत मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणं काही शिवसैनिकांना महागात पडलं.

एखाद्या पक्षाचा मोठा नेता आला की त्यांचे नेते कार्यकर्ते यांची झुंबड उडते. प्रत्येकाला वाटते आपल्या नेत्यांपर्यंत आपण पोहचले पाहिजे. त्यांना आपण दिसलो पाहिजे, आपली उपस्थिती आपल्या नेत्याच्या नजरेत जावी या साठी उत्साही कार्यकार्ये नेत्यांसाठी पुष्पगुच्छ घेऊन जातात. नेतेही मोठ्या आनंदाने कार्यकर्ते नेते यांचे पुष्पगुच्छ आनंदाने स्वीकारत असतात. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदा दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आले. मराठवाड्यातील सेनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उद्धव ठाकरे यांना भेटायला आले. काही लोकांनी उद्धव ठाकरे यांना भेटायला येतांना चांगले महागडे पुष्पगुच्छ घेऊन आले. मात्र त्यातील काही कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ आणून पश्चाताप करण्याची वेळ आली.

रोहितला निवडून देण्यासाठी बारामतीकरांनी केलं जीवाचं रान - अजित पवार

कारण लातूर येथील रमेश पाटील आणि जालना येथील मनीष श्रीवास्तव यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड भरावा लागला. हा दंड औरंगाबाद महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनीच ठोठावला. त्याचं  झाले असे की या दोघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पुष्पगुच्छ आणले त्यामध्ये प्लास्टिक वापरले गेले.  राज्यात प्लास्टिकवर बंदी असल्याने असं करणं हे कायदा मोडणारं ठरतं.  नेत्यासमोर जास्त गोंधळ नको म्हणून दोघांनीही आढेओढे न घेता दंड भरला आणि काढता पाय घेतला. या दोघांनी पुष्पगुच्छ आणलेल्या इतर नेते कार्यकर्ते यांना दंडाची खबर दिली. त्यामुळे ज्या पुष्पगुच्छांमध्ये प्लास्टिक होते त्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ लपवून ठेवले किंवा चुपचाप काढता पाय घेतला.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच उद्धव आणि राज ठाकरेंचं मुंबईत शक्तिप्रदर्शन

अस्तिककुमार पांडे हे नवीनच औरंगाबाद महापालिकेत रुजू झाले आहेत. त्यांचे स्वागत करायला आलेल्या नगर रचना विभागाच्या प्रमुखलाच प्लास्टिक गुंडाळलेला पुष्पगुच्छ आणला म्हणून पाच हजाराचा दंड केला होता. एक नगरसेविकेने सुद्धा प्लास्टिक मध्ये गुंडाळलेली भेटवस्तू अस्तिककुमार यांना दिली त्यांनाही पाच हजाराचा दंड भरावा लागला.

औरंगाबादेतील सर्व पक्षाच्या नेते कार्यकर्ते यांना अस्तिककुमार यांचा प्लास्टिक बंदी बद्दलचा दणका माहीत होता. म्हणून औरंगाबाद मधून मुख्यमंत्री यांना भेटायला आलेली नेते कार्यकर्ते यांनी प्लास्टिक रहित पुष्पगुच्छ आणले. अस्तिककुमार यांचा हा महिमा माहीत नसलेले लातूर आणि जालना येथील या कार्यकर्त्यांना माहीत नव्हता म्हणून फसले. आयुक्तांच्या या कारवाईची चर्चा चांगलीच रंगली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2020 07:28 PM IST

ताज्या बातम्या