खळबळजनक! आई आणि मुलगी शेळीला चारा आणण्यासाठी गेल्या, नंतर विहिरीत सापडला दोघींचा मृतदेह

खळबळजनक! आई आणि मुलगी शेळीला चारा आणण्यासाठी गेल्या, नंतर विहिरीत सापडला दोघींचा मृतदेह

सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 17 फेब्रुवारी : औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे एका विहिरीत आई आणि मुलीचे प्रेत आढळून आले आहे. आई आणि मुलगी शनिवारपासून बेपत्ता होत्या. दोघीही माय-लेकी या शेळीला चारा आणण्यासाठी गेलेल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांकडून दोघींचा शोध घेण्यात येत होता. अशातच डोंगरगाव शिवारातील एका विहिरीत आज सकाळी शेतात मोटर चालू करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास हे मृतदेह आढळून आले. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळून 2 तास झाले असले तरी घटनास्थळी पोलिसांनी येण्यास उशीर केला, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. तसंच पोलिसांच्या या भूमिकेमुळे मृतांचे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.

आईला रोज मारहाण करणाऱ्या पित्याला मुलानेच संपवलं, डोक्यात घातली लाकडी फळी

दरम्यान, आई आणि मुलीच्या गूढ मृत्यूमुळे डोंगरगाव परिसरात खळबळ उडाली आहे. या दोघींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published: February 17, 2020, 9:29 PM IST

ताज्या बातम्या