महाराष्ट्र

  • associate partner

IPL सट्टा : कॉलसेंटरवर छापा टाकल्यानंतर शिक्षिकाच सापडल्या, उघड झाली धक्कादायक माहिती

IPL सट्टा :  कॉलसेंटरवर छापा टाकल्यानंतर शिक्षिकाच सापडल्या, उघड झाली धक्कादायक माहिती

पोलिसांनी या कॉलसेंटरमधून तब्बल 52 मोबाईल, लॅपटॉप, सेटटॉप बॉक्स, रिमोट कंट्रोल व रोख 12 हजार रुपये जप्त केले.

  • Share this:

सचिन जिरे, औरंगाबाद, 24 ऑक्टोबर : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावण्यासाठी कॉलसेंटर उघडणाऱ्या काही महिलांसह अन्य दहा जणांना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास रोजेबागेत छापा मारुन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच पाच लाख 57 हजारांचा ऐवज जप्त केला. विशेष म्हणजे बेटींग लावणाऱ्या सट्टेबाजांशी संपर्क साधण्यासाठी तीन ते चार महिला शिक्षिकांचा देखील वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या कॉलसेंटरमधून तब्बल 52 मोबाईल, लॅपटॉप, सेटटॉप बॉक्स, रिमोट कंट्रोल व रोख 12 हजार रुपये जप्त केले.

ताब्यात घेतलेल्या एका शिक्षेकेनं धक्कादायक खुलासा केला आहे. 'लॉकडाऊनपूर्वी मी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. लॉकडाऊनमुळे आमचे पगार बंद झाले. घर चालवणं अवघड झालं. त्यामुळे आम्ही काम शोधायला सुरुवात केली. माझ्याच शाळेत काम करणारी एक महिला मला भेटली. मॅच सुरू होण्याच्या एक तास आधी आणि मॅच संपल्यानंतर एक तास कॉल रिसीव्ह करायचं काम होतं. त्यासाठी महिन्याला सात हजार रुपये मिळणार होता. त्यामुळे मी हे काम करण्याचं ठरवलं. आम्हाला हाच सट्टाबाजार आहे याची कल्पनादेखली नव्हती. पोलीस आले, धाड टाकली त्यावेळेस कळलं हा सट्टाबाजार आहे,' असा खुलासा या महिलेनं केला आहे.

रोजेबाग टाटा स्टेडिअमशेजारच्या एका इमारतीत महिला व पुरुष सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल व्हॉटसअ‍ॅपद्वारे सट्टा लावत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना मिळाली होती. त्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक सय्यद मोहसीन अली यांनी गुरुवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास फुलबन, प्लॉट क्र. 2-ई, सिडको, एन-12 येथे छापा मारला.

त्यावेळी पोलिसांनी शेख नवीद शेख मुजाहीद, शेख इमरान उर्फ रोनी पिता शेख चाँद , फरहाना मंजील, शादी महल हॉल रोड, मोईन खान मुजीब खान , इम्रान खान इरफान खान, शेख फरहान शेख मिया , मोहंमद रेहान शेख अश्पाक , सय्यद समीर सय्यद नसीर, सौरभ आत्माराम खाडे , शेख शाकीब शेख शरिफ , कासीफ खान नासेर खान यांच्यासह आठ महिलांना ताब्यात घेतले. तर चौघे घटनास्थळावरुन पसार झाले. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2020, 9:56 PM IST

ताज्या बातम्या