गाडीला धक्का लागल्याचा बनाव करून लुटमार, भामट्यांची टोळी जेरबंद

गाडीला धक्का लागल्याचा बनाव करून लुटमार, भामट्यांची टोळी जेरबंद

ही टोळी व्यापाऱ्यांवर लक्ष ठेऊन रात्रीच्या सुमारास व्यापाऱ्यांच्या कारला दुचाकी धडकवत असत. त्या नंतर दुचाकी दुरुस्त करून द्या असं भांडण करत व्यापाऱ्यांच्या कार मध्ये बसून त्यांना निर्जनस्थळी नेत आणि लुटलं जात असे.

  • Share this:

सचिन जीरे, औरंगाबाद 16 ऑगस्ट : व्यापाऱ्यांच्या कारला  धक्का लागल्याचा बनाव करून त्यांना लुटणारी भामट्यांची टोळी अखेर जेरबंद झालीय. औरंगाबाद शहर आणि परिसरात या टोळीने धुमाकूळ घातला होता. अनेक व्यापाऱ्यांना या टोळीने लाखो रुपयांनी लुटले होते. आता या टोळीचा छडा लागल्याने त्यांच्याकडून अनेक घटनांचं सत्य बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. या टोळीकडून  व्यापाऱ्यांकडून लुटण्यात आलेल्या तीन लाखांपैकी पावणे दोन लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.

नाशिक बाजार समितीला ग्रहण, सभापतीला लाच घेताना अटक

औरंगाबाद शहरात  व्यापाऱ्यांच्या  कारमधून  पैशाची बॅग पळविण्याच्या अनेक घटना समोर आल्यात. ही टोळी  व्यापाऱ्यांवर लक्ष ठेऊन रात्रीच्या सुमारास व्यापाऱ्यांच्या कारला दुचाकी धडकवत असत. त्या नंतर दुचाकी दुरुस्त करून द्या असं भांडण करत व्यापाऱ्यांच्या कार मध्ये बसून त्यांना निर्जनस्थळी नेत आणि चाकुचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटलं जात असे.

शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार निवेदन

भांडण नको म्हणून व्यापारी किंवा ज्यांच्या गाडीला अपघात झाला ते लोक प्रकरण मिटविण्याच्या उद्देशाने या लोकांशी बोल असतं. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन यांनी अशा लोकांना लुटण्याची एक पद्धतच तयार केली होती. वारंवार अशा घटना घडत असल्याने वापाऱ्यांमध्येही दहशत निर्माण झाली होती.

राष्ट्रवादीला धक्का देत विधानसभेआधी धनराज महालेंचा शिवसेनेत प्रवेश

अशीच घटना 14 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास सिडकोच्या हनुमान चौकात घडली होती. हीच मोडस ऑपरेंडी वापरत चोरट्यांनी टाईल्सचे व्यापारी हरजित चांभारिया यांना चाकुचा धाक दाखवत तीन लाख रुपये लुटले होते. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि या टोळीच्या मुसक्या आवळल्या. औरंगाबाद जिल्ह्यात टोळीने अनेक  गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या