औरंगाबाद मनपा निवडणूक वादग्रस्त होण्याची शक्यता, वॉर्ड रचनेत गोंधळच गोंधळ

औरंगाबाद मनपा निवडणूक वादग्रस्त होण्याची शक्यता, वॉर्ड रचनेत गोंधळच गोंधळ

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका पुढील महिन्यामध्ये होणार आहेत. त्यासाठी आरक्षण आणि वॉर्ड रचनेची सोडत करण्यात आली. त्यावर यामध्ये प्रचंड गोंधळ झाला आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांच्या तक्रारी आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 11 फेब्रुवारी - महानगरपालिकेची निवणूक पुढच्या महिन्यात होवू घातली आहे. त्यामुळे वॉर्ड रचना आणि आरक्षणाच्या सोडती झाल्या. वॉर्ड रचनेत अनेक नगरसेवकांनी मनपा आधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करायला सुरवात केली आहे. महापालिका अधिका-यांनी केलेल्या वार्ड रचनेवर संशय घेतला जात आहे. त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांकडे तक्रारींचा आकडा वाढला आहे. महापालिकेत सतत निवडूण येणा-या काही नगरसेवकांनी आपल्या सोईची वार्ड रचना करून घेतली आहे. यामध्ये महापालिकेच्या अधिका-यांनी निवडणूक आयोगाने ढरवून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचाही आरोप केला जातोय.

आरक्षण सोडती मध्येही प्रचंड घोळ घालण्यात अल्याचही ओरड होत आहे. वार्ड रचना करतांना नियमांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले गेल्याची चर्चा आहे. मनासाखी सोडत आणि वार्ड रचना व्हावी या साठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप होत आहे. शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. वार्ड रचना आणि आरक्षण सोडतीमध्ये गोंधळ झाला असेल तर शासणामार्फेत त्याची चौकशी केली जाईल. आणि या चौकशीचा अहवाल औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही पाठवला जाईल अस आश्वासन घोसाळकर यांनी दिले.

सात दिवसात 246 आक्षेप; एकाच वार्डासाठी 70 आक्षेप

राज्य निवडणूक आयोगाने वार्ड रचना करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला पारदर्शक आध्यादेश काढला होता. नविन मुंबई महापालिकेने ज्या आधारावर वार्ड रचना केली. ज्यामुळे नविन मुंबई महापालिकेमध्ये जास्त वाद झाले नाहीत आणि आक्षेप मोठ्या प्रमाणात आले नाहीत. तोच आधार औरंगाबादेत वापरावा अशी सुचना देण्यात आली होती.

धक्कादायक! शिक्षकच झाले हल्लेखोर, शाळेच्या संस्थापकावर जीवघेणा हल्ला

मात्र निवडणूक आयोगाच्या या सूचनेकडे औरंगाबाद महापालिकेच्या अधिका-यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे गोंधळ उडाला आहे.

सातारा देवळाई परिसरात या अधिकाऱ्यांनी कहरच केला आहे. या बागातील काही घरांचे तुकडे करून वेगवेगळ्या वार्डात दाखवले आहे. एकाच घराचे दोन तुकडे करून दोन वार्डात विभागले आहे. अनेकजण आता पुराव्यासह आराखड्यासह समोर येत असल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी गोंधळावर कोणताही अधिकारी प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. काही जण आता पुराव्यासह कोर्टातही जाण्याची तयारीत आहेत. सिडको पोलीस ठाण्यात तर चक्क वार्ड चोरीला गेल्याची तक्रारही करण्यात आली आहे. महापालिका अधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्यावर आरोप सुरू असतांना यो दोघांच्याही वतीन वार्ड रचना आणि अरक्षण सोडत योग्य असल्याचा दावाही केला जात नाही.

इंदुरीकर महाराज आपल्याच किर्तनामुळे अडचणीत, होणार गुन्हा दाखल

First published: February 11, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading