औरंगाबाद महापालिका उपमहापौर निवडणूक : 5 नगरसवेकांना मतदानापासून रोखले

औरंगाबाद महापालिका उपमहापौर निवडणूक : 5 नगरसवेकांना मतदानापासून रोखले

या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढवत आहेत.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 31 डिसेंबर : औरंगाबाद महापालिकेत आज उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर भाजपच्या उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढवत आहेत. मात्र उशिरा आलेल्या 5 नगरसेवकांना बाहेरच उभे करण्यात आले. त्यांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

उपमहापौर निवडणुकीतील मतदानासाठी उशिरा आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजप 2 एमआयएम 1 आणि 2 अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांना मतदान प्रक्रिपासून रोखण्यात आलं आहे.

कोण आहेत हे 5 नगरसेवक?

शेख जफ्फर अख्तर - एमआयएम

मलके गिकुलसिंग संपतसिंग - अपक्ष

जंजाळ राजेंद्र हिमत्तराव - शिवसेना

कैलास लक्ष्मण गायकवाड - अपक्ष

अफसर खान यासीन खान - काँग्रेस

श्रीमती शबाना बेगम कुरेशी - अपक्ष

विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणातील समीकरणं बदलली आहेत. शिवसेनेनं भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं. राज्यात बदललेल्या या समीकरणांचे औरंगाबादमध्येही परिणाम होणार आहेत. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांचा राजीनामा शिवसेनेचे महापौर नंदू घोडीले यांनी मंजूर केला होता.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – 29

एमआयएम – 25

भाजप – 22

काँग्रेस – 08

राष्ट्रवादी – 04

इतर – 24

एकूण – 112

दरम्यान, औरंगाबाद पालिकेचा विचार करायचा झाला तर गेली 27 वर्षे भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढवत आहे. त्यांना अपक्षांचा पाठिंबा असल्यामुळे दोघांची सत्ता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील युतीचं गणित बिघडलं आणि महाविकासआघाडीचं सरकार आल्यानं त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर दिसायला लागले. मागच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र न बसता वेगवेगळे बसल्यामुळे काहीशी कुजबूज होत असतानाच काही दिवसांपूर्वी उपमहापौरांनी राजीनामा दिला. हा राजीनामा आता मंजूर करण्यात आला. त्यानंतर उपमहापौरपदासाठी आज मतदान होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 31, 2019, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading