भाजपला चितपट करत औरंगाबादमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केली मदत

भाजपला चितपट करत औरंगाबादमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केली मदत

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र आल्याने भाजपला पराभवाची चव चाखावी लागली.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 31 डिसेंबर : औरंगाबाद महापालिकेत आज उपमहापौर पदासाठी निवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी विजय मिळवला आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र आल्याने भाजपला पराभवाची चव चाखावी लागली.

राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर भाजपच्या उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडीमध्ये असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी ही निवडणूक एकत्र लढवली. त्यामुळे शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेना 51 मते घेत विजय मिळवला. तर भाजप पुरस्कृत उमेवादाराला 33 तर एमआयएम ला 18 मते मिळाली.

5 नगरसेवकांना रोखले

उपमहापौर निवडणुकीसाठी उशिरा आलेल्या 5 नगरसेवकांना बाहेरच उभे करण्यात आले. त्यांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आल्याची माहिती आहे. उपमहापौर निवडणुकीतील मतदानासाठी उशिरा आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजप 2 एमआयएम 1 आणि 2 अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांना मतदान प्रक्रिपासून रोखण्यात आलं आहे.

कोण आहेत हे 5 नगरसेवक?

शेख जफ्फर अख्तर - एमआयएम

मलके गिकुलसिंग संपतसिंग - अपक्ष

जंजाळ राजेंद्र हिमत्तराव - शिवसेना

कैलास लक्ष्मण गायकवाड - अपक्ष

अफसर खान यासीन खान - काँग्रेस

श्रीमती शबाना बेगम कुरेशी - अपक्ष

राज्यातील काडीमोडाचा परिणाम औरंगाबादमध्ये

औरंगाबाद पालिकेचा विचार करायचा झाला तर गेली 27 वर्षे भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढवत आहे. त्यांना अपक्षांचा पाठिंबा असल्यामुळे दोघांची सत्ता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील युतीचं गणित बिघडलं आणि महाविकासआघाडीचं सरकार आल्यानं त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर दिसायला लागले. मागच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र न बसता वेगवेगळे बसल्यामुळे काहीशी कुजबूज होत असतानाच काही दिवसांपूर्वी उपमहापौरांनी राजीनामा दिला. हा राजीनामा आता मंजूर करण्यात आला. त्यानंतर उपमहापौरपदासाठी आज मतदान झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: aurangabad
First Published: Dec 31, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या