मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: मनपाविरोधात मनसेचं आक्रमक पाऊल, थेट कोविड तपासणी केंद्रावर राडा

VIDEO: मनपाविरोधात मनसेचं आक्रमक पाऊल, थेट कोविड तपासणी केंद्रावर राडा

अनेक ठिकाणी तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत तर कुठे व्यापाऱ्यांना द्यायला प्रमाणपत्र मनपाकडे नाहीत त्यामुळे ही व्यापाऱ्यांनाची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला.

औरंगाबाद, 20 जुलै : औरंगाबाद मनपा कोविड तपासणी केंद्रावर जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी तपासणी बंद करण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांना तपासणी सक्ती करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत तर कुठे व्यापाऱ्यांना द्यायला प्रमाणपत्र मनपाकडे नाहीत त्यामुळे ही व्यापाऱ्यांनाची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला.

औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील व्यापाऱ्यांना दुकान सुरू करण्याआधी कोरोना चाचणी अनिवार्य केली होती. मात्र ऐनवेळी इतक्या व्यापाऱ्यांना तपासणी करून घेणे शक्य नाही. त्यातच मनपाने आदेश काढले असले तरी त्यांचीच यंत्रणा सज्ज नासल्याच पाहायला मिळालं. त्यामुळे मनपा यंत्रणा सज्ज करा आणि नंतर तपासणी करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी केली आहे.

पुण्यात जर लॉकडाऊन वाढलं तर आम्ही आत्मदहन करू, व्यापारी वर्गाचा थेट इशारा

औरंगाबाद शहरात 10 ते 18 जुलै या काळात जनता कर्फ्युचे पालन करण्यात आले. मात्र शुक्रवारी 17 जुलै सायंकाळी मनपा आयुक्तांनी व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली. चाचणी प्रमाणपत्र असल्याशिवाय दुकान उघडता येणार नाही अश्या सूचना देण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी चाचणी करण्यासाठी शनिवारी गर्दी केली. मात्र कोविड सेंटरवर कुठल्याच प्रकारची तयारी नसल्याने व्यापाऱ्यांनी गोंधळ घातला.

पवारांवर लिहलेली अश्लील पोस्ट पोलीस पाटलाला भोवली, अशी झाली कारवाई

त्यानंतर पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांना तपासणी अनिवार्य करण्यात आली. अस असलं तरी गेल्या दोन दिवसांमध्ये नियोजन नसल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या चाचण्या झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना आपली दुकान सुरू करता आली नाहीत.

पुण्यात जोडप्याच्या लग्नामुळे कोरोनाचा कहर, एकाच कुटुंबातील 17 जण पॉझिटिव्ह

तर सकाळी भाजी विक्रीसाठी येणाऱ्या भाजीविक्रेत्यांना पाच हजारांचा दंड लावण्याची तंबी मनपा पथकाने दिली. त्यामुळे मनपाचे नियोजन नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टीव्ही सेंटर भागात कोविड तपासणी केंद्रावर गोंधळ घातला. नियोजन होई पर्यंत व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका अशी मागणी मनसेने केली. व्यापाऱ्यांना तपासणी प्रमाणपत्र देई पर्यंत तपासणी करू नये यासाठी आंदोलन केले.

First published:

Tags: Coronavirus