औरंगाबाद विधानपरिषद : काँग्रेसच्या बंडखोर नेत्यामुळं 'युती'चा विजय पक्का

औरंगाबाद विधानपरिषद : काँग्रेसच्या बंडखोर नेत्यामुळं 'युती'चा विजय पक्का

अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या 110 मतदानाच्या पाठिंब्या मुळे माझा विजय पक्का असल्याचं युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सांगितलं.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 19 ऑगस्ट : औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारसंघात आज निवडणूक झाली. या विधानपरिषद निवडणुकीत 98.50 टक्के मतदान झालं. 657 पैकी 647 जणांनी मतदान केलं. 10 मतदार मतदानाला गैरहजर राहिले. अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या 110 मतदानाच्या पाठिंब्या मुळे माझा विजय पक्का असल्याचं युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आपलाच विजय पक्का आहे असंही ते म्हणाले. या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्यात मुख्य लढत झाली.

लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या पराभवामुळे सेनेचं औरंगाबादमध्ये खच्चीकरण झालं होतं. त्यामुळे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये लक्ष घातलं होतं.  शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी युतीच्या सर्व मतदारांना तंबी दिली होती.

राज ठाकरेंवरची 'ईडी'ची पीडा टाळण्यासाठी हजारो मनसैनिक देणार साहेबांची साथ!

तसंच गद्दारी केल्यास सोडणार नाही, असा इशाराही दिला होता. तर दुसरीकडे काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांच्याकडे सेनेएवढे संख्याबळ नाही. मात्र दुसऱ्या पसंदीच्या मतदानाची त्यांना आशा होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणाचं किती संख्याबळ?

विधानपरिषद निवडणुकीत एकूण 556 मतांपैकी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या अंबादास दानवे यांच्याकडे युतीचे 336 मतदान आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीच्या अंबादास दानवे यांचा विजय पक्का समजला जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी यांच्यासाठी ही लढत फारच कठीण मानली जात होती.

विरोधकांची मागणी धुडकावली, पूरग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी नाही

काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी आपलं वजन युतीचे पारड्यात टाकलं. त्यामुळे दानवे यांचा विजय पक्का मानला जातोय. सत्तार यांनी भाजपशी जवळीक साधली असून विधानसभा निवडणुकीआधी ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 19, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading