'वॉटर ग्रिड' म्हणजे कोरड्या नद्या जोडून खिसे ओले करण्याचा कार्यक्रम, प्रा.देसरडांचा आरोप

जो नदी जोड (वॉटर ग्रिड ) प्रकल्प आहे तो कोरड्या नद्या जोडून खिसे ओले करण्याचा राजरोस लूटीचा कार्यक्रम आहे. हे 'वॉटर हार्वेस्ट' नाही तर 'मनी हार्वेस्ट' योजना आहे. सध्या 'पैसा आडवा, पैसा जिरवा'चे काम सुरु आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रा.एच.एम देसरडा यांनी केला.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 05:59 PM IST

'वॉटर ग्रिड' म्हणजे कोरड्या नद्या जोडून खिसे ओले करण्याचा कार्यक्रम, प्रा.देसरडांचा आरोप

बीड, 18 ऑगस्ट- जो नदी जोड (वॉटर ग्रिड ) प्रकल्प आहे तो कोरड्या नद्या जोडून खिसे ओले करण्याचा राजरोस लूटीचा कार्यक्रम आहे. हे 'वॉटर हार्वेस्ट' नाही तर 'मनी हार्वेस्ट' योजना आहे. सध्या 'पैसा आडवा, पैसा जिरवा'चे काम सुरु आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रा.एच.एम देसरडा यांनी केला. त्यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा.देसरडा यांनी नद्या जोड प्रकल्पाची पोल खोल केली.

प्रा.देसरडा म्हणाले की, नद्या जोडा म्हणजे घरातील नळ फिटिंग करणे थोडीच आहे. निसर्ग रचना जलशास्त्र, भूशास्त्र याचा विचार न करता राज्यकर्त्यांनी वॉटर ग्रीड योजना आणली आहे. राज्यकर्त्याना फक्त मोठ-मोठ्या योजना लागतात. जेवढ्या योजना मोठ्या तेवढे खिसे भरण्यास सोपे जाते, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण मंडळाच्या माध्यमातून वसूंधरा बचाव, शेतकरी बचाव..या मोहिमेसाठी बीड शहरात आले असता प्रा.देसरडा यांनी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी वॉटर ग्रीड योजनेची पोलखोल केली. मराठवाड्याचे दुष्काळी संकटं हे अस्मानी कमी सुलतानी जास्त आहे. आज नद्यामध्ये वाळू नाही. डोंगरावर वन नाही. निसर्गाची ऐसी तैसी करुन विकास करू, अशी आश्वासने दिली जात आहेत. कोरड्या नद्या जोडून काय होणार आहे. नद्या जोडणे म्हणजे पाईप फिटिंग करणे थोडीच आहे. हे प्रकल्प निसर्गनिर्मित साधन संपत्ती विरोधी आहे. देशातील नदी जोड प्रकल्पाची किंमत आज 20 लाख कोटी तर महाराष्ट्रातील काहीलाख कोटी तर मराठवाड्यात 25 हजार कोटी किंमत आहे. कोरड्या नद्या जोडून काय होणार हा विकास नाही तर हा विनाश आहे. दुष्काळ हे संकट अस्मानी नसून सुलतानी आहे. हे शासन निर्मित आहे, अशी टीका प्रा.देसरडा यांनी यावेळी केली.

शिव, फुले, शाहूच्या भूगर्भातील पाणी आणि माणसांत माणुसकी होती. राजकारण्यांनी ती संपवली आहे. विकास या शब्दाची आता भीती वाटते. विकासच्या नावाने विनाश होतोय.

तंत्रज्ञान, शिक्षण आणि निसर्गाच्या विकासच्या नावाने लुटणे सुरु आहे. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण मंडळाच्या माध्यमातून वसूंधरा बचाव , शेतकरी बचाव..या तून लोकांना या खऱ्या गोष्ट कळव्यात यासाठी प्रयत्न करत आहे, असेही प्रा.देसरडा यांनी यावेळी सांगितले.

Loading...

VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिवंत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 05:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...