लोकसभेत तोंडावर आपटलात, आता झाकली मुठ ठेवा; तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

लोकसभेत तोंडावर आपटलात, आता झाकली मुठ ठेवा; तावडेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

काँग्रेसची स्थिती वाईट आहे. त्यांना जनाधार राहिलेला नाही त्यामुळे लोकच त्यांना विधानसभेत नाकारतील. अशोक चव्हाणांनी नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्याचा पराभव झाला.

  • Share this:

शेख मुजीब, नांदेड 24 सप्टेंबर : भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी भाजपचे नेते विनोद तावडे आज नांदेडमध्ये होते. नांदेड हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असल्यानं तावडे यांनी चव्हाणांवर हल्लाबोल केला. तावडे म्हणाले, अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये यावेळी बोलतांना तावडे यांनी अशोक चव्हाण यांना डिवचणारे वक्तव्य केलंय. लोकसभेला तुम्ही तोंडावर आपटलात त्यामुळे विधानसभेत झाकली मुठ ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, काँग्रेसची स्थिती वाईट आहे. त्यांना जनाधार राहिलेला नाही त्यामुळे लोकच त्यांना विधानसभेत नाकारतील. अशोक चव्हाणांनी नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्याचा पराभव झाला.

राष्ट्रवादीतून उदयनराजेंविरोधात कोण? पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना वेग

नांदेड हा अशोक चव्हाणांचा गढ समजला जातो. काँग्रेसची ही सर्वात सुरक्षीत जागा समजली जात होती. राहुल गांधी यांना नांदेडमधून निवडणूक लढविण्याची चर्चाही केली जात होती. मात्र मोदींच्या लाटेत काँग्रेसचा हा सर्वात सुरक्षीत गढही ढासळला गेला. आता बिकट स्थिती असल्याने काँग्रेसने आपल्या सर्व दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणुका लढविण्याचे आदेश दिले आहेत. आधीच काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर आऊट गोईंग झाल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालंय ते नुकसान टाळण्यासाठी दिग्गज नेत्यांना निवडणुक लढण्याचे आदेश देण्यात आले असून ते आदेश कितपत पाळले जातात हे आता लवकरच दिसणार आहे.

विधानसभेच्या एण्ट्री आधीच राज ठाकरे भाजपच्या टार्गेटवर, 'कोहिनूर मिल'वर टीका

विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद झाला. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

'एमआयएमने कुठलंही लॉक लावलेलं नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मला आदेश करावा मी त्यांच्या आदेशाचं पालनच करेन. आजही मी आंबेडकरांना वंचितचा सर्वेसर्वा मानतो. शेवटपर्यंत बाळासाहेबांच्या आदेशाची वाट पाहत राहीन,' अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे. आधी जागावाटपावरून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणाऱ्या जलील यांनी आता असं वक्तव्य केल्याने वंचित आघाडीचं सूत पुन्हा जुळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

साताऱ्यात होणार रणसंग्राम, लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

 

'गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही. 'एमआयएम'सोबत (MIM)युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,' अशी प्रतिक्रिया एमयाएमने साथ सोडल्यानंतर 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी बाळासाहेबांनी शुभेच्छाही दिल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 03:45 PM IST

ताज्या बातम्या