तुमच्या भागात 'ढग' आहेत का? या व्हायरल मेसेजने अधिकारी त्रस्त

तुमच्या भागात 'ढग' आहेत का? या व्हायरल मेसेजने अधिकारी त्रस्त

ढगांची माहिती विभागीय कार्यलयाला कळवा असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक कार्यालयाला कळवू लागले आणि विचारणा करू लागले. त्यामुळे नेमकं काय झालं हे अधिकाऱ्यांना आधी कळालच नाही.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 22 ऑगस्ट :सोशल मीडियाच्या जगात कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. एखादी घटना घडायला उशीर की त्यावर असंख्य खऱ्या खोट्या गोष्टी व्हायरल होत असतात. या सोशल मीडियाने सर्वच जगालाच खऱ्या अर्थाने जवळ आणलंय. यातूनच अनेक अफवाही जन्माला येतात. त्यात काही तथ्य आहे की नाही याची शहानिशा न करता ती कशी पसरते याचं एक उदाहरण सध्या औरंगाबादेत पाहायला मिळतंय.

सध्या मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातोय. त्यावरुन 'आपल्या भागात कृत्रिम पाऊस पडण्यायोग्य ढग असल्यास त्याची माहिती औरंगाबाद विभागीय कार्यालयाला कळावा असं मेसेज मराठवाड्यात व्हायरल होतोय. मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येतोय. त्यामुळे ढगांची माहिती विभागीय कार्यलयाला कळवा असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक कार्यालयाला कळवू लागले आणि विचारणा करू लागले. त्यामुळे नेमकं काय झालं हे अधिकाऱ्यांना आधी कळालच नाही. सारखी विचारणा होऊ लागल्याने शेवटी या व्हायरल मेसेजचा खुलासा झाला.

कामचुकार अधिकाऱ्यांना दणका, वेळेत काम झालं नाही तर कापणार पगार

शेवटी विभागीय कार्यालयानं खुलासा करून ही अफवा असल्याचं सांगितलं. तसच यात कोणतंही तथ्य नाही असाही खुलासा विभागीय कार्यालयाला करावा लागलाय. विभागीय कार्यालयावर इमारतीवर स्थापन केलेल्या रडारद्वारे ढगांची पाणीक्षमता निश्चित करुन तज्ज्ञ्यांच्या संमतीने ढगांवर विमानाद्वारे फवारणी केली जातीये त्यामुळे आम्हाला फोन करुन कृत्रिम ढगांची माहिती देऊ नका अशी विनंतीच विभागीय आयुक्त कार्यालयाने केलीयं.

आमच्याकडे होते तेव्हा भ्रष्टाचारी 'बबन्या' आणि भाजपमध्ये गेले की 'बबनराव', व्वा!

25 गावातल्या शेतकऱ्यांनी पिकांवर फिरवला नांगर

मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. कोल्हापूर, सांगलीत तर महापूराने हाहाकार उडाला. मात्र,मराठवाड्यातील अनेक जिल्हे अजून कोरडेच आहेत. ऑगस्ट महिना संपत आला असताना बीड जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. पावसाळ्याचा दोन महिन्याचा कालावधी कोरडा गेला. जून महिन्याच्या थोड्या पावसावर लागवड झाली. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद उगवला. मात्र पुन्हा पावसाने पाठ फिरवली. उभी पीकं जळण्याच्या मार्गावर आहेत. पाऊस पडला नाही त्यामुळे खरीपाची पीकं हातची गेली. आता रब्बीची पेरणी तरी करु, या आशेने बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील 25 गावामधील शेतकऱ्यांने उभ्या कापसासह खरीपाच्या पिकांवर नांगर फिरवला आहे.

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा, उभी पीकं डोळ्यादेखत जाताहेत जळून!

बीड जिल्ह्यात दुष्काळाचे संकट पुन्हा एकदा गडत झाले आहे. शेतकरी हाताश झाला आहे. दुष्काळाचा दशावतार पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऑगस्ट महिना मावळतीकडे झुकला, मात्र पाऊस झाला नाही. खरीप हंगाम हातचा गेला आहे. थोड्याशा पावसावर कापूस आणि खरीपाची लागवड केली. मात्र पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने पिकाचे रोपटे सुकू लागली आहे. वाढ खुंटली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वडवणी, कवडगांव, साळीबा मामला, मोरेवाडी, खळवट लिमगाव, पिपरखेड, देवडी, चिंचोटी, बाघेगव्हान, हिरवगव्हान चिचांळा, हरिचंद्र पिप्री येथील हजारो शेतकऱ्यांने कापसाच्या उभ्या पिकांत औत घालून पीक आपल्या हाताने उद्धवस्त केली आहेत. कापासासह, सोयाबीन, मठ, मूग, उडीद या पिकांवरही नांगर फिरवला लागला. अंदाजे 2 हजार हेक्टवरील खरीप पीक आतापर्यंत उद्धवस्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 09:13 PM IST

ताज्या बातम्या