बीडमधील 25 गावातल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर फिरवला नांगर

बीडमधील 25 गावातल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर फिरवला नांगर

बीड जिल्ह्यात दुष्काळाचे संकट पुन्हा एकदा गडत झाले आहे. शेतकरी हाताश झाला आहे. दुष्काळाचा दशावतार पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

  • Share this:

बीड, 22 ऑगस्ट- मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. कोल्हापूर, सांगलीत तर महापूराने हाहाकार उडाला. मात्र,मराठवाड्यातील अनेक जिल्हे अजून कोरडेच आहेत. ऑगस्ट महिना संपत आला असताना बीड जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. पावसाळ्याचा दोन महिन्याचा कालावधी कोरडा गेला. जून महिन्याच्या थोड्या पावसावर लागवड झाली. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद उगवला. मात्र पुन्हा पावसाने पाठ फिरवली. उभी पीकं जळण्याच्या मार्गावर आहेत. पाऊस पडला नाही त्यामुळे खरीपाची पीकं हातची गेली. आता रब्बीची पेरणी तरी करु, या आशेने बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील 25 गावामधील शेतकऱ्यांने उभ्या कापसासह खरीपाच्या पिकांवर नांगर फिरवला आहे.

बीड जिल्ह्यात दुष्काळाचे संकट पुन्हा एकदा गडत झाले आहे. शेतकरी हाताश झाला आहे. दुष्काळाचा दशावतार पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऑगस्ट महिना मावळतीकडे झुकला, मात्र पाऊस झाला नाही. खरीप हंगाम हातचा गेला आहे. थोड्याशा पावसावर कापूस आणि खरीपाची लागवड केली. मात्र पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने पिकाचे रोपटे सुकू लागली आहे. वाढ खुंटली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वडवणी, कवडगांव, साळीबा मामला, मोरेवाडी, खळवट लिमगाव, पिपरखेड, देवडी, चिंचोटी, बाघेगव्हान, हिरवगव्हान चिचांळा, हरिचंद्र पिप्री येथील हजारो शेतकऱ्यांने कापसाच्या उभ्या पिकांत औत घालून पीक आपल्या हाताने उद्धवस्त केली आहेत. कापासासह, सोयाबीन, मठ, मूग, उडीद या पिकांवरही नांगर फिरवला लागला. अंदाजे 2 हजार हेक्टवरील खरीप पीक आतापर्यंत उद्धवस्त केले आहे.

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...

पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिकं डोळ्यादेखत जळून जात आहेत. जनावरांच्या आणि माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यांत टँकर आणि चारा छावण्या सुरु आहे. बीड जिल्ह्यातील लहान-मोठे (मध्यम-लघु )144 प्रकल्प अजून मृत साठ्यात आहेत. पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही पाणी पहायला मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. खरीप पिकांचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

बीड तालुक्यांतील आनंदवाडी आणि वासनवाडी शिवारातील पांडुरंग यांची आठ एकर शेती होती. त्यांनी शेतात कापूस, मका आणि बाजारी लावली. एकरी 10 हजार खर्च आला पण आत्ता शेतात जावून पाहिले तर सर्वकाही जळून गेल्याचं दु:ख त्यांनी व्यक्त केलं. मका करपून गेला तर कापसाची वाढ खुंटली आहे. ऐन दुष्काळात लाख रुपये शेतात घालून देखील पदरात काहीच पडत नाही म्हणून हा शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय. खायला टाकायला काही नाही म्हणून 70 हजार रुपयाची जनावरे 35 हजारांना विकल्याचं पांडुरंग गोरे यांनी सांगितलं. मुलांची शिक्षणं आणि घर कसं चालवायचं असा त्यांच्यापढे आता प्रश्न आहे.

अनेक शेतकऱ्यांची कपाशी, सोयाबीन तूर मूग, उडीद ही पिके करपून गेल्याने कुटुंब जागवायचं कसं हा शेतकऱ्यांपुढचा खुप मोठा प्रश्न आहे. इथे राहून काय करावं डोळ्यादेखत पिकं जळत्यात ते पाहवत नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. मागच्या चार वर्षात सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. शेतीत पेरणीसाठी खर्च केला पण हातात काहीच पडलं नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नच गंभीर आहे. कोरडी आश्वसनं नको तर ठोस उपाय योजना करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प कोरडा ठाक आहे. यामुळे दुष्काळ डोकावतो कीं काय यांची चिंता आहे. पावसाचे काळे कुट्ट ढग हुलकावणी देत आहे. जून महिन्यातच्या शेवटी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणीची कामे उरकून घेतली. पाऊस येईल या भाबड्या आशेवर शेतकरी होता आता मात्र त्याचा धीर संपत चालला असून पाऊस आला नाही तर त्याच्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट पडणार आहे.

VIDEO : शिवसेनेच्या संजय राऊतांची राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया, ऐका काय म्हणाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 01:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading