अमित शहा समजदार नेते; 'हमारी मुख्यमंत्री....' घोषणेवर पंकजांनी दिलं उत्तर

अमित शहा समजदार नेते; 'हमारी मुख्यमंत्री....' घोषणेवर पंकजांनी दिलं उत्तर

या आधीही पंकजा मुंडे यांनी मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनही जोरदार राजकीय चर्चाही झाली होती.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद 10 ऑक्टोंबर : दसऱ्याच्या दिवशी सावरगाव इथं झालेल्या मेळाव्यात भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. याच मेळाव्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी हजेरी लावल्याने त्या कार्यक्रमाला वेगळं महत्त्व आलं होतं. याच सभेत प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांनी हमारी मुख्यमंत्री अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावरून निवडणुकीच्या प्रचारात वेगळी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी सष्टीकरण दिलंय. सावरगाव येथे भगवान बाबांच्या भक्तांनी मला CM, CM असं म्हंटलं होतं. या भगवान बाबाच्या भक्तांच्या घोषणा होत्या. अमित शहा हे खूप समजदार नेते आहेत. त्यांना या घोषणेचा अर्थ कळतो असं स्पष्टिकरण त्यांनी दिलं. मी फक्त भाजप युतीचं काम करणार आहे असंही त्या म्हणाल्या.

अजित दादांना विजयी करण्यासाठी सर्व कुटुंबच उतरलं प्रचारात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा माझ्या कार्यक्रमांसाठी आलेत हे माझं भाग्य आहे. माझं वजन वाढलं असं काही नाही. कारण भाजपमध्ये नेत्यांचं वजन असं काही नसतं असंही त्यांनी सांगितलं. परळीतल्या लढतीविषयी त्या म्हणाल्यात, परळीच्या निवडणुकीची मला भीती वाटली असती. मात्र माझ्याकडे वेळच नसल्याने  मला जाणवत नाही. परळीमध्ये माझ्यात आणि धनंजय मुंडे यांच्यातली लढत सोपी नाही परळीची निवडणूक एकतर्फी नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री फडणवीस करतात रात्री 12 वाजता फोन, अमित शहांनी सांगितला किस्सा!

सावरगावमध्ये काय झालं?

भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सावरगाव इथं मेळाव्याला उपस्थित होते.  त्यानिमित्ताने पंकजा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सभेच्या ठिकाणी पंकजा यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. अगदी अमित शहा यांचं भाषण सुरू असतानाही पंकजा समर्थक घोषणाबाजी करत होते. हमारी मुख्यमंत्री कैसी हो... पंकजा मुंडे जैसी हो! अशा घोषणा सुरू झाल्या आणि भाजपमधली मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली. या आधीही पंकजा मुंडे यांनी मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून जोरदार राजकीय चर्चाही झाली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 10, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading