जालना, 18 मार्च : कोरोनामुळे लोकांच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे. कोरोना संपतो असं कुठे वाटत असताना पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असताना दिसत आहे. कोरोनामुळे अनेक नागरिकांच्या नोकरीवर गदा आली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्येही कोरोनाची भीती असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जात आहे. मात्र जालनातून एक अजब प्रकार समोर आला आहे. (Allow dance bars, lodges and liquor stores in schools Strange demand of school association to CM)
कोरोना संपेपर्यंत शाळेत डान्सबार, लॉज, मद्यविक्रीची परवानगी द्या, अशी मागणी केली जात आहे. लॉकडाऊनमुळे संस्थाचालक त्रस्त झाले असून अशावेळी पैसे कमविण्यासाठी शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी द्या, असं पत्र इंग्रजी शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. यातून राज्यसरकारला भरभक्कम महसूल मिळेल, असंही या पत्रात म्हटलं आहे.
हे ही वाचा-BREAKING : 10 वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना
काय लिहिलंय पत्रात?
जालन्यातील शाळा असोसिएशनने अत्यंत त्रस्त होत मुख्यमंत्र्यांकडे अशी अजब मागणी केली आहे. 31 मार्च जवळ आल्याने बँकेच्या अधिकारी शालेय इमारतीसाठी व इतर बाबींसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी रोज शाळेत येऊन संस्थाचालकांच्या कुटुंबावर कारवाई करण्याचं आणि मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीसा पाठवत आहेत. जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत, असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.