औरंगाबादेत आदित्य ठाकरे यांना अडवलं, कचरा डेपोमुळे शेती धोक्यात

औरंगाबादेत आदित्य ठाकरे यांना अडवलं, कचरा डेपोमुळे शेती धोक्यात

औरंगाबाद कचरा डेपोवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना संतप्त शेतकऱ्यांचा सामना करावा लागला. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे औरंगाबादेत आले असता संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अडवले.

  • Share this:

औरंगाबाद, 31 ऑगस्ट- औरंगाबाद कचरा डेपोवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना संतप्त शेतकऱ्यांचा सामना करावा लागला. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे औरंगाबादेत आले असता संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अडवले. कचरा डेपोमुळे परिसरातील शेती धोक्यात आली आहे. कचरा डेपोतील कचऱ्यावर नियमित प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. या वेळी चंद्ररकांत खैरे, आमदार आंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, तालुका प्रमुख केतन काजे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पावसामुळे जन आशीर्वाद यात्रा अर्धवटच..

कन्नड शहरामध्ये युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे यांचा जन आशीर्वाद यात्रा व विजय संकल्प मेळावा पावसामुळे अर्धवटच राहिला. केतन काजे व शिवसैनाकांनी गिरणी मैदनावर जय्यत तयारी केली होती. खुर्ची डोक्यावर घेऊन कार्यकर्ताची भाषण ऐकण्याची तयारी दाखवली. पण आदित्य यांनी वेळेचे बंधन व पावसामुळे भाषण अवघ्या दोन मिनिटांत संपवले.

दरम्यान, शिवसेनेची ही जन आशिर्वाद यात्रा व संकल्प यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे राज्यभराचा दौरा करत आहे. शिवसेनेच्या यात्रेला जन आशिर्वाद उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. इतर पक्षाच्या यात्रेवर जनतेने नाराजी व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. शेतकरी कर्जमुक्त, बेरोजगारी नसलेला असा नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असल्याचे ते यावेळी म्हणाले.

कार्यकर्त्यांचा हिरमोड...

आदित्य ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवसैनिक व शेतकरी पोळ्याचा सण सोडून मोठया संख्येने गिरणी मैदणावर उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच पावसाला सुरूवात झाली. यामुळे शिवसैनिक व शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. खुर्ची डोक्यावर घेऊन कार्यकर्ताची भाषण ऐकण्याची तयारी दाखवली. पण आदित्य यांनी वेळेचे बंधन व पावसामुळे भाषण अवघ्या दोन मिनिटांत संपवले.

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या