महापालिकेच्या लाचखोर अभियंत्यासह नगरसेविकेचा पती ACB च्या जाळ्यात

महापालिकेच्या लाचखोर अभियंत्यासह नगरसेविकेचा पती ACB च्या जाळ्यात

घराच्या भिंतीवर व पायऱ्यांवर लाल रंगाची निशाणी करून रोडच्या कामकाजाच्या नावाखाली बांधकाम पाडण्याची दिली धमकी...

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 15 डिसेंबर: औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला भाजपने राजकीय भूकंप केला असताना महापालिकेत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. लाचखोर अभियंत्यासह नगरसेविकेचा पतीला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराच्या घराच्या भिंतीवर व पायऱ्यांवर लाल रंगाची निशाणी करून रोडच्या कामकाजाच्या नावाखाली बांधकाम पाडण्याची आरोपींनी धमकी दिली होती. नंतर कारवाई थांबवण्यासाठी त्याच्याकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती.

वामन राघोबा कांबळे असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे. ते अतिक्रमण विभागात कार्यरत आहे. विजय हरिषचंद्र निकाळजे असे अभियंत्याला साथ देणाऱ्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रस्ता रुंदीकरणांच्या नावाखाली बांधकाम पाडण्याची धमकी देऊन वामन कांबळे

आणि विजय निकाळजे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,औरंगाबाद येथे लेखी तक्रार दिली असता त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी सापळा रचून दोन्ही आरोपींना प्रथम हप्त्यापोटी एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींंविरुद्ध क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शिवसेना-भाजपची काडीमोड..

सत्तासंघर्षावरून राज्यात भाजप-शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा करून सत्ता स्थापन केली. याचे पडसाद आता औरंगाबाद महापालिकेत पडले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सकाळी चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. भाजपच्या उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विजय औताडे यांच्यासह भाजपचे सर्व 22 नगरसेवकांनी एकत्र राजीनामा दिला आहे. सेना-भाजप नगरसेवक गोंधळ आता नवीन वळणावर पोहोचला आहे.

भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले की, सर्व नगरसेवक लवकरच राजीनामा देणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून याची कुणकुण सगळ्यांना लागली होती. अखेर शुक्रवारी सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला. जवळपास 27 वर्षे एकत्र नांदलेल्या भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी आता काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरीही औरंगाबाद पालिकेचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनाम दिली आहे. शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत विजय औताडे यांनी नेहमीप्रमाणे महापौरांच्या खुर्चीजवळ न जाता नगरसेवकांमध्ये जाणे पसंत केले. त्यानंतर औताडे यांनी राजीनाम्याची घोषणा करत खळबळ उडवून दिली. औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अवघे चार महिने बाकी असताना भाजपने हा पवित्रा घेतला आहे.

राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय?

औरंगाबाद पालिकेचा विचार करायचा झाला तर गेली 27 वर्षे भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढवत आहे. त्यांना अपक्षांचा पाठिंबा असल्यामुळे दोघांची सत्ता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील युतीचं गणित बिघडलं आणि महाविकासआघाडीचं सरकार आल्यानं त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर दिसायला लागले. मागच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र न बसता वेगवेगळे बसल्यामुळे काहीशी कुजबूज होत असतानाच शुक्रवारी उपमहापौरांनी दिलेला राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. शुक्रवारी सकाळी महापालिकेची सर्वसाधारण सभा होताच भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी महापौरांशोजारी बसणं टाळलं. याबाबत त्यांना विचारलं असता राज्यातील युती तुटली आहे आणि भाजप महाविकासआघाडी विरोधात असताना औरंगाबादमध्ये युती अद्याप कशी या प्रश्नांना उत्तर द्याली लागत आहेत, असं उपमहापौर विजय औताडे यांनी सांगितलं. असं असेल तर मी 10 व्या मिनिटांला माझा राजीनामा देतो, म्हणत त्यांनी आपला राजीनामा सादर केल्यानं पालिकेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

औरंगाबाद महापालिकेवर काय होऊ शकतो परिणाम

औरंगाबाद पालिकेच्या निवडणूका अवघ्या 5 महिन्यांवर आल्या असताना भाजपच्या उपमहापौरांनी आपला राजीनामा सादर केला आहे. भाजपने पालिकेतील युती तोडली तर शिवसेनेसमोर अडचणी निर्माण होण्याची चिन्हं आहेत. सध्या पालिकेत शिवसेना-भाजप आणि त्यांना अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा असं समीकरण असल्यानं ते कोलमडू शकतं. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं समीकरणं स्थानिक पातळीवरही होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – 29

एमआयएम – 25

भाजप – 22

काँग्रेस – 08

राष्ट्रवादी – 04

इतर – 24

एकूण – 112

Published by: Sandip Parolekar
First published: December 15, 2019, 8:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading