औरंगाबाद: आरोप बनवतो अशी भीती दाखवून पोलिसाने घेतली 50 हजारांची लाच, ACBने केलं जेरबंद

औरंगाबाद: आरोप बनवतो अशी भीती दाखवून पोलिसाने घेतली 50 हजारांची लाच, ACBने केलं जेरबंद

फक्त संशयावरून हा पोलीस त्याला वारंवार चौकशीसाठी बोलवत होता आणि सहआरोपी करण्याची धमकी देत होता. पैसे उकळण्यासाठीच तो हे उद्योग करत होता.

  • Share this:

औरंगाबाद 22 ऑक्टोबर: पोलिसांचं काम हे रक्षण करणं हे आहे. मात्र जर पोलिसानेच आरोपी बनवतो असा धाक दाखवून पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी बोलावून पोलिसाने  सहआरोपी न करण्यासाठी आरोपींकडूनच 50 हजाराची लाच मागितली. त्याची तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) सापळा रचून त्याला अटक केली.

संतोष रामदास पाटे असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. औरंगाबादमधल्या सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्या बाबत तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी फौजदार पाटे यांनी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालय गाठत तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला व 50 हजार रुपयांची मागणी करताना व ती स्वीकारल्याचे निष्पन्न होताच पथकाने छापा मारून स्वीकारलेली लाचेची रक्कम जप्त केली. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फक्त संशयावरून हा पोलीस त्याला वारंवार चौकशीसाठी बोलवत होता आणि सहआरोपी करण्याची धमकी देत होता. पैसे उकळण्यासाठीच तो हे उद्योग करत होता. अखेर त्याने 50 हजारांची लाच मागितली होती.

या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनीच अशा प्रकारची लाच मागितल्यामुळे कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलीस धाक आणि धमकी देऊन असे प्रकार करत असतील तर काय धाक राहणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 22, 2020, 10:43 PM IST
Tags: police

ताज्या बातम्या