मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आठ तासांनंतर अब्दुल सत्तार बोलले; राजीनामानाट्याबद्दल काय म्हणाले पाहा..

आठ तासांनंतर अब्दुल सत्तार बोलले; राजीनामानाट्याबद्दल काय म्हणाले पाहा..

शिवसेनेचे एकमेव मुस्लीम आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांमध्ये फिरत होत्या. आठ तासांनंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा नाट्यावरचं मौन सोडलं.

शिवसेनेचे एकमेव मुस्लीम आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांमध्ये फिरत होत्या. आठ तासांनंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा नाट्यावरचं मौन सोडलं.

शिवसेनेचे एकमेव मुस्लीम आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांमध्ये फिरत होत्या. आठ तासांनंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा नाट्यावरचं मौन सोडलं.

औरंगाबाद, 4 जानेवारी : शिवसेनेचे एकमेव मुस्लीम आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांमध्ये फिरत होत्या. आठ तासांनंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा नाट्यावरचं मौन सोडलं. "माझ्या राजीनाम्याच्या अफवा आहेत. त्या ज्यांनी उठवल्या त्यांनाच विचारा. मी आत्ता कुठलंही उत्तर देणार नाही. योग्य वेळी बोलेन", असं सत्तार म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला मुंबईला निघालो आहे, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बातमीने महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप झाला होता. मात्र शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी भूमिका मांडून या बातमीचं खंडन केलं. तरी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेत पराभव झाला याचं खापर अब्दुल सत्तार यांच्यावर फोडलं. "सत्तार यांच्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेला फटका बसला", असा आरोप खैरेंनी केल्याने अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबद्दल संभ्रम कायम होता. आता स्वतः सत्तार यांनीच माध्यमांसमोर येत राजीनाम्याच्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

खैरेंची सत्तारांवर गद्दार म्हणून जहरी टीका

माजी खासदार चंद्रकांत खैरे अब्दुल सत्तार यांच्यावर चांगलेच संतापले होते. 'अब्दुल्ल सत्तार हे गद्दार असून त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका', अशी सडकून टीका खैरेंनी केली.

सविस्तार वाचा - सत्तार हे गद्दार, 'मातोश्री'वर पाय ठेवू देऊ नका, चंद्रकांत खैरे संतापले

'महाविकासआघाडीमुळे अब्दुल सत्तार हे मंत्री झाले. तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार यांच्यामुळे भाजपला मदत मिळाली. सत्तार यांनी सेनेशी गद्दारी केली आहे. आम्ही शिवसेना मोठ्या कष्टाने उभी केली आहे. आज महाविकासआघाडीमुळे मंत्री झाल्यानंतर असं वागणे हे सहन करण्यापलीकडे आहे. सत्तार हे गद्दार आहे. त्यांना 'मातोश्री'वर पाय ठेवू देऊ नका. मुंबईतले शिवसैनिकही त्यांना मातोश्रीवर पाय ठेवू देणार नाही',  अशी संतप्त प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.

संबंधित - औरंगाबाद निवडणुकीत मोठं नाट्य, समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निवडला अध्यक्ष

अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक होते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं.

अब्दुल सत्तारांचा काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून बंडखोरी करत अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अब्दुल सत्तार हे खरंतर भाजपमध्ये प्रवेश करणार होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सत्तार यांना सिल्लोड मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसपासून दूर गेलेले अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले.

जिल्हा परिषद निवडणुकीबाबतही नाराजी

सध्या राज्यभर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र सत्तार यांनी शिवसेनेपासून वेगळी भूमिका घेत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्तार यांच्या राजीनाम्यामागे जिल्हा परिषद निवडणुका हेदेखील कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

अन्य बातम्या

मी सरकारच्या कामावर नाराज, सेनेच्या आमदाराचा घरचा अहेर

भाजपबरोबर काँग्रेसनेही केली पाकविरोधी निदर्शनं; 'आप'नेही नोंदवला निषेध

 

First published:
top videos

    Tags: Abdul sattar, Aurangabad (City/Town/Village), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)