शिक्षणासाठी लातूरमध्ये आलेला विद्यार्थी दोन वर्षांपासून बेपत्ता

शिक्षणासाठी लातूरमध्ये आलेला विद्यार्थी दोन वर्षांपासून बेपत्ता

अक्षयला बारावीत 83 टक्के गुण मिळाले होते. नेट परिक्षेची तो तयारी करत होता. मात्र अचानक तो लातूरमधून बेपत्ता झाला.

  • Share this:

नितीन बनसोडे, लातूर 2 सप्टेंबर : शिक्षणाचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रात गाजला होता. याच शिक्षणासाठी बीडमध्ये मोठी स्वप्न घेऊन लातूरमध्ये आलेला एक विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी त्याचं कुटुंबीय तर वणवण फिरत आहे. मात्र पोलीस आणि CIDलाही त्याचा काही ठाव ठिकाना लागत नाहीये. आपला हुशार असलेला मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानं त्याच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. पण त्याची वाट पाहण्याशीवाय त्यांच्या हातात आता कहीच नाहीये. त्यामुळच पोलिसांनीही आता मदतीचं आवाहन केलंय.

मकरध्वज उर्फ अक्षय देवकते असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव आहे. अक्षयला बारावीत 83 टक्के गुण मिळाले होते. घरची परिस्थिती सामान्य. वडील शेतकरी. मात्र आपल्या गुणी मुलासाठी त्यांनी पै पै जमवून त्याला पुढच्या शिक्षणासाठी लातूरला पाठवलं.  2015 मध्ये बीड जिल्ह्यातल्या ढेकणमोहा या गावातून अक्षय दहावी झाला. त्यानंतर त्याने अकरावी सायन्सला लातूरच्या दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीत त्याला 83 टक्के गुण मिळाले. नंतर त्याने नेट परीक्षेच्या तयारीसाठी शाहू कॉलेजात प्रवेश घेतला.

भाजपचे 'हे' दोन दिग्गज नेते शिवसेनेशी जागावाटपावर चर्चा करणार!

लातूर शहरातल्या माताजी नगरमध्ये तो  भाड्याने राहत होता.   27 मार्च 2017 रोजी तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोध घेऊनही न सापडल्याने विवेकानंद पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या पालकांनी तक्रार दाख केली. तब्बल तीन PSI आणि एक ASIच्या टीमने त्याचा बराच शोध घेतला. मित्र आणि इतरांच्या अशा 19 जणांची चौकशी केली आणि जबाब घेतली. मात्र पोलिसांना यश आलं नाही.

'युती'चा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार', शिवसेनेची गुगली!

अखेर अक्षयचा तपास CIDमार्फेत केला गेला. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांची, हॉस्पिटल्सची आणि इतर ठिकाणची माहिती घेऊनही वर्षभरापासून CIDलाही त्याचा काही शोध लागत नाहीये.  अखेर कुणाला काही माहिती मिळाली तर कृपया 9604222822  या क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती सीआयडी पोलिसांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 11:16 PM IST

ताज्या बातम्या