पैशाच्या वादातून भर रस्त्यात एकाची हत्या, शस्त्रांनी वार करून घेतला जीव

वाळूचा व्यवसायातून निर्माण झालेल्या वादातून भर रस्त्यात बाप लेकांनी फिरोजची शस्त्रांनी हत्या केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 07:39 PM IST

पैशाच्या वादातून भर रस्त्यात एकाची हत्या, शस्त्रांनी वार करून घेतला जीव

सचिन जीरे,औरंगाबाद18 ऑगस्ट : माणसाचा जीव स्वस्त झाला की काय असं वाटावं अशा घटना सध्या घडत आहेत. आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याने औरंगाबाद शहरात एकाची हत्या झाल्याने खळबळ उडालीय. भररस्त्यात गाठून शस्त्रांनी हत्या करण्यात आली. फिरोज खान असं हत्या झालेल्या व्यक्तिचं नाव आहे. घटनेमागे आणखी कुठली कारणं आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या हत्येनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा धाक संपलाय का असा सवाल विचारला जातोय. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीय.

फिरोज खान यांचा वाळूचा व्यवसाय होता. वाळूच्या व्यवसायत अनेक गैरप्रकार होतात हे आता काही लपून राहिलं नाही. प्रत्येक शहरांमध्ये आणि गावात अनेक वाळूमाफीया तयार झाले आहेत. यातूनच फिरोज खान आणि हुसेन खान यांनी काही आर्थिक व्यवहार केले होते. त्या व्यवहारातून वाद झाले आणि त्यातून भांडण विकोपाला गेलं. यातूनच हुसेन खान आणि त्यांच्या दोन मुलांनी मिळून फिरोज यांची हत्या केली.

नागपुरात गुंडांची दहशत, तरुणीच्या घरात घुसून काढली छेड,

फिरोज हे काही कामासाठी जात असताना त्यांची आणि हुसेन खान यांची रस्त्यात भेट झाली. हुसेन खान यांच्यासोबत त्यांची इब्राहिम आणि इम्रान ही दोन मुलंही सोबत होती. ते फिरोज यांच्या मागवरच होते. त्यांची भेट झाल्यावर पुन्हा जुना विषय काढून त्यांच्यात भांडण झालं आणि ते टोकाला गेलं. हुसेन आणि त्यांच्या मुलांनी जवळ शस्त्र आणली होती. त्यांनी फिरोजवर शस्त्रांनी वार करायला सुरूवात केली त्यातच फिरोज यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रवादीच्या आणखी एका गडाला हादरा, फलटणचे ‘राजे’ भाजपमध्ये जाणार?

Loading...

संजयनगर भागातील दादा कॉलोनी भागात ही घटना घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी  हुसेन खान, इब्राहिम खान व मुलगा इम्रान या बाप- लेकांना अटक केली आहे. घटनेनंतर जिन्सी भागात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime
First Published: Aug 19, 2019 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...