मुलासाठी वाट्टेल ते, आईजवळून सहा दिवसाचं मूल चोरलं आणि मुलीला आणून ठेवलं

मुलासाठी वाट्टेल ते, आईजवळून सहा दिवसाचं मूल चोरलं आणि मुलीला आणून ठेवलं

मुलगी झाल्याने हॉस्पिटलमधल्या मुलाची चोरी झाल्याने स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलमधल्या घटनेनं प्रचंड खळबळ उडालीय.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 14 ऑक्टोंबर :  वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी सहा दिवसांच्या मुलाचं त्याच्या आईजवळून अपहरण करून तिथे मुलीला ठेवल्याचा खळबळजनक प्रकार अंबेजोगाई मध्ये उघडकीस आलाय. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या प्रसूती पश्चात कक्षातून सहा दिवसापूर्वी जन्मलेल्या पुरुष जातीच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. त्याच वेळी रुग्णालयातील दुसऱ्या वार्डात एका महिला स्त्री जातीचे नवजात अर्भक ठेऊन पसार झाल्याने मुलाच्या लालसेतून त्या महिलेनेच बाळ चोरून नेले असावे असा संशय व्यक्त करण्यात येतोय. या घटनेच्या निमित्ताने रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळपणाबद्दल संताप व्यक्त होतोय.

स्मृती इराणी आपल्या भावावर का 'जळतात', त्यांनीच केला हा खुलासा!

धारूर येथील सैफ शेख यांची पत्नी सफिना या प्रसूतीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल झाली होत्या. बुधवारी सायंकाळी 7 वाजता त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. सीझर झाल्यामुळे सफिना यांच्यावर सध्या रुग्णालयात वार्ड क्र. 6 मध्ये उपचार सुरु होते. आज सोमवारी दुपारी त्यांचे नातेवाईक थोड्या कालावधीसाठी बाहेर गेले होते. दुपारी 12 वाजताच्या सुमारास बाळाला जवळ घेतलेल्या सफिना यांनाही झोप लागली. दुपारी 1 वाजता जाग आल्यानंतर त्यांना शेजारी बाळ दिसून न आल्याने त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

नारायण राणे यांनी जाहीर केली 'शिवसेने'वर आतापर्यंतची सर्वात मोठी भूमिका

तेवढ्यात त्यांचे नातेवाईकही परतले आणि घटना समजल्यावर त्यांनी बाळाचा सर्वत्र शोध सुरु केला. परंतु, संपूर्ण रुग्णालयाचा परिसर पालथा घालूनही बाळाचा शोध लागला नाही. दरम्यान, याचवेळी एक महिला रुग्णालयातील वार्ड क्र. 8 मध्ये आली. प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करत तिने स्वतःजवळील अर्भक तिथे दाखल असलेल्या एका महिलेच्या जवळ ठेवले आणि पसार झाली. हे स्त्री जातीचे अर्भक सध्या रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात सुखरूप आहे. घटनेबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे, दहिफळे आणि जमादार कुलकर्णी यांनी रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली.

EXCLUSIVE : शिवसेनेसाठी नारायण राणेंनी टाकलं एक पाऊल पुढे, म्हणाले...

या दोन्ही घटनाचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्या महिलेनेच मुलाच्या हव्यासापोटी मुलगी ठेऊन ते बाळ चोरून नेले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे स्वाराती रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मनमोहन सिंगांपासून काही तरी शिका, निर्मला सितारमन यांच्या पतींचा मोदींना सल्ला!

अवघे सहा दिवसापूर्वी जन्मलेले बाळ चोरीला गेल्यामुळे त्याच्या आईची अवस्था अत्यंत बिकट आहे. बाळाचे वडील सैफ शेख आणि त्यांचे नातेवाईक तीव्र संताप व्यक्त करत असून या घटनेसाठी त्यांनी ढिसाळ प्रशासनाला दोषी धरले आहे. तर, बाळ सांभाळण्याची जबाबदारी आमची नसून नातेवाईकांची असल्याचं सांगत रुग्णालय प्रशासनाने हात वर केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2019 08:02 PM IST

ताज्या बातम्या