Home /News /maharashtra /

विजेची तार तुटल्याने 30 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

विजेची तार तुटल्याने 30 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

उसामध्ये सुकलेला पालापाचोळा असतो. त्यामुळे ही आग चांगलीच भडकली आणि सगळा उसच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

माजलगाव 9 डिसेंबर: माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथे 30 एकर उसाच्या शेताला आग लागून ऊस जाळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. विद्युत वाहक तार तुटल्याने शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. या आगीमध्ये तीस एकर ऊस जळाला आहे. माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब आल्यानंतर आग आटोक्यात आली यात सुदैवाने  जीवितहानी टळली मात्र शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरात आडगाव येथील शेतकरी भारत शेजूळ , चंद्रकला शेजुळ , दत्ता शेजुळ , लहु शेजुळ , बाळासाहेब शेजुळ , बाळासाहेब गोरे , गणेश शेजुळ , हरिभाऊ शेजुळ , छत्रभुज शेजूळ , धोंडीराम शेजूळ , वचिष्ठ शेजुळ , नामदेव शेजुळ , तुकाराम शेजुळ या शेतक - यांच्या शेतातुन विज वाहक तारा गेलेल्या आहेत. दुपारी अचानक विज वाहक तार तुटल्याने उसाला लागलेल्या आगीत तीस एकर उस जळाला असुन लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. उसामध्ये सुकलेला पालापाचोळा असतो. त्यामुळे ही आग चांगलीच भडकली आणि सगळा उसच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पावसाळ्यात झालेला प्रचंड पाऊस, नंतरचा वादळ वाऱ्यांच्या तडाखा अशा अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. त्यात अशी संकटं आलीच तर त्याला आणखी हादरा बसतो.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या