18 दिवसांपूर्वी विवाह.. तरुणाचा खून करून मृतदेह फेकला गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी

18 दिवसांपूर्वी विवाह.. तरुणाचा खून करून मृतदेह फेकला गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी

  • Share this:

औरंगाबाद,19 सप्टेंबर: मांडीत चाकू खुपसून पत्नीने आपल्या उद्योजक पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असताना औरंगाबाद शहरात आणखी एक खून झाल्याचे समोर आले आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी फेकण्यात आला. शफिक खान रफिक खान (वय-28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शफिक खान रफिक खान याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

18 दिवसांपूर्वी झाला होता विवाह..

शफिक कुटुंबासह कुतुबपुऱ्यात राहत होता. घाटी परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. 14 महिन्यांपूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. शफिकला पहिल्या पत्नीपासून चौदा महिन्यांचा मुलगा आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर प्रसूतीदरम्यान त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबाने 30 ऑगस्ट रोजी त्याचा दुसरा विवाह लावून दिला होता. परंतु विवाहाला 18 दिवस झाल्यानंतर त्याचा खून झाला आहे.

अचानक झाला बेपत्ता...

शफिक घाटी हॉस्पिटल परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. मंगळवारी रात्री नऊ वाजेनंतर तो अचानक बेपत्ता झाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही. कुटुंबाने घाबरून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. बुधवारी सकाळी महावितरणचे कर्मचारी गोगाबाबा परिसरात काम करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे मृतदेह आढळला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक सय्यद सिद्दिक, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

VIDEO:मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला? फडणवीसांनी केला खुलासा

First published: September 19, 2019, 4:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading