औरंगाबादेत तिसरा खून.. दुचाकी देत नाही म्हणून नशेखोरांनी केली तरुणाची हत्या

औरंगाबादेत तिसरा खून.. दुचाकी देत नाही म्हणून नशेखोरांनी केली तरुणाची हत्या

दुचाकी देत नाही म्हणून काही नशेखोरांनी एका 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पाडेगाव कासम्बरीनगर भागात घडली आहे.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,25 सप्टेंबर: दुचाकी देत नाही म्हणून काही नशेखोरांनी एका 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पाडेगाव कासम्बरीनगर भागात घडली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका आठवड्यात तरुणाची हत्या झाल्याची तिसरी घटना समोर आली आहे.

सय्यद जमीर सय्यद जहीर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. परिसराकतीलच काही ओळखीचे टवाळखोर नेहमी दुचाकी मागत असल्याने वैतागलेल्या जमीर ने त्यांना काही दिवसांपासून दुचाकी देणे बंद केले होते. या रागातून काही दिवसांपूर्वी त्याची दुचाकी फोडण्यात आली होती. मात्र, मंगळवारी रात्री काही नशेखोरांनी जमीरला कासम्बरी नगर भागात बोलावून बेदम मारहाण केली. नंतर धारदार शस्त्राने त्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पोलीस हत्येचा तपास करत आहेत.

दरम्यान, औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी फेकण्यात आला होता. शफिक खान रफिक खान (वय-28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो शहरातील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. शफिक खान रफिक खान याचा गळा आवळून खून करण्यात आला होता.

18 दिवसांपूर्वी झाला होता विवाह..

शफिक कुटुंबासह कुतुबपुऱ्यात राहत होता. घाटी परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. 14 महिन्यांपूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. शफिकला पहिल्या पत्नीपासून चौदा महिन्यांचा मुलगा आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर प्रसूतीदरम्यान त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबाने 30 ऑगस्ट रोजी त्याचा दुसरा विवाह लावून दिला होता. परंतु विवाहाला 18 दिवस झाल्यानंतर त्याचा खून झाला आहे.

अचानक झाला बेपत्ता...शफिक घाटी हॉस्पिटल परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. मंगळवारी रात्री नऊ वाजेनंतर तो अचानक बेपत्ता झाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही. कुटुंबाने घाबरून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. बुधवारी सकाळी महावितरणचे कर्मचारी गोगाबाबा परिसरात काम करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे मृतदेह आढळला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक सय्यद सिद्दिक, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

VIDEO : शरद पवार Uncut प्रेस कॉन्फरन्स; म्हणाले, 27 तारखेला मीच ED ऑफिसला जाणार

First published: September 25, 2019, 4:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या