Elec-widget

महाराजांच्या दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाचा घाला.. 13 ठार, 8 जखमी

महाराजांच्या दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाचा घाला.. 13 ठार, 8 जखमी

मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातील सहा, सोलापूर जिल्ह्यातील दोन तर परभणी, सांगली, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश

  • Share this:

लातूर, 24 नोव्हेंबर: राजस्थानातल्या नागौर जिल्ह्यात मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 13 भाविकांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. कुचमान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किशनगड-हनुमानगड मेगा हायवेवर शनिवारी हा अपघात झाला. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील याकतपूर येथून सर्व भाविक हरियाणातील हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनाला मिनी बसने निघाले होते. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातील सहा, सोलापूर जिल्ह्यातील दोन तर परभणी, सांगली, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दोघे जण कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली आहे. आठ जण जखमी असून त्यांच्यावर नागौर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहिती माहिती अशी की, लातूर, सोलापूर, जिल्ह्यातील काही जण आपल्या नातेवाईक, मित्रांसोबत हरयाणातल्या हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनासाठी जात होते. मिनी बस (एमएच-23 एएस 7176) शनिवारी पहाटे तीन वाजता राजस्थानातल्या नागौर जिल्ह्यातील कुचमान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किशनगड-हनुमानगड मेगा हायवे वरून जात होती. त्याचवेळी मिनीबसच्या समोर अचानक एक रानगवा आला. त्याला गाडीची धडक बसल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नंतर बस रस्त्याशेजारच्या एका झाडावर आदळली. बसचा वेग जास्त असल्यामुळे बसचा चक्काचूर झाला. 13 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कुचामन येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भगवान बेम्बडे (50), मयूरी बेम्बडे ( 18 दोघेही रा. याकतपूर, ता औसा, जि. लातूर), सुमित्रा गोवर्धन सांगवे (35), सिद्धी गोवर्धन सांगवे (9 दोघेही रा.लामजना, ता. औसा, जि. लातूर), सुप्रिया बालाजी पवार (16), अरूणा हणमंत तौर (55, दोघेही रा. किल्लारी, जि. लातूर), शालूबाई वसंत शेळके (60), रूक्मिणी ज्ञानेश्वर शेळके (दोघेही रा. चिलाईवाडी, जि. सोलापूर), रामचंद्र तुकाराम पवार (30, रा. सांगली), शिवप्रसाद दत्ता ठाकूर (28, रा. परभणी), श्यामजी गायकवाड (55), बळीराम बालाजी पवार (27, दोघेही रा. कर्नाटक), गोविंद (पूर्ण नाव समजलेले नाही) वय 28 (रा. बीड) अशी मृतांची नावे आहेत. तर, ज्ञानेश्वर वसंत शेळके (35), गायत्री ज्ञानेश्वर शेळके ( 6), श्रावणी ज्ञानेश्वर शेळके (2), लक्ष्मी पांडुरंग शेळके ( 30), प्रताप वसंत शेळके (35, सर्व रा. चिलाईवाडी, जि. सोलापूर), आदर्श सांगवे (6 रा. लामजना, जि. लातूर), अनोळखी महिला (40), अनोळखी मुलगा (7) अशी जखमींची नावे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2019 08:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...