12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नोकरी करून चालवत होता उदरनिर्वाह

12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नोकरी करून चालवत होता उदरनिर्वाह

हॉटेलकडून वेटरसाठी परिसरातच राहण्यासाठी एक खोली देण्यात आली आहे. या खोलीतच अमोलने सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,8 जानेवारी: हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शहरातील वेदांतनगर भागात ही घटना घडली आहे. अमोल विष्णू मोरे (वय-19) वर्षीय मृत विद्यार्थाचे नाव आहे.

अमोल हा 12 वीचा विद्यार्थी होता. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने तो वेदांतनगर येथील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. मिळालेल्या पैशाने स्वतःचा शिक्षणाचा खर्च भागवत होता. हॉटेलकडून वेटरसाठी परिसरातच राहण्यासाठी एक खोली देण्यात आली आहे. या खोलीतच अमोलने सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोलने आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वृद्ध दाम्पत्याने मुलासारखं समजून सांभाळलं, त्यानेच केला विश्वासघात

दुसरीकडे, लोणावळा शहरात खळबळ उडवणाऱ्या वृद्ध महिलेच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात लोणावळा गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. अवघ्या चार दिवसात संपूर्ण घटनेचा मोठ्या शिताफीने तपास करत राजस्थान येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोणावळा बाजारपेठेतील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी पुरुषोत्तम बंसल यांचे दुकान आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या दुकानात अशोक कुमार सरगरा हा कामगार कामाला होता दुपारच्या वेळेस बंसल हे अशोक कुमार याला घरून जेवणाचा डबा आणण्यासाठी पाठवत होते. याच कारणाने घरात कोठे काय ठेवले आहे याची संपूर्ण माहिती अशोक कुमार याला होती. विश्वासू कामगार असल्याने बंसल दाम्पत्य ही अशोक कुमार यास मुलाप्रमाणे सांभाळत होते.

पैशाचा मोह सुटेना

बन्सल यांच्या किराणा दुकानातून काम सोडल्याच्या 6 महिन्यानंतर पैशाच्या लोभापायी अशोक कुमार याने आपला लोणावळ्यातील दुसरा मित्र जगदीश कुमार जोदाजी याला सोबत घेत पुरुषोत्तम बन्सल यांच्या द्वारकामाई सोसायटीतील राहत्या घरात जबरी चोरी करण्याचा प्लान आखला. त्यानुसार, दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अशोक तसंच जगदीश या दोघांनी सिद्धिविनायक सोसायटीतील बन्सल यांच्या घराचा दरवाजा वाजवला घरात वयोवृद्ध रेशम बंसल या नेहमीप्रमाणे एकट्याच होत्या पूर्वी आपल्या दुकानातील ओळखीचा कामगार असल्याने रेशम यांनी दोघांना घरात बोलावलं.

ज्या माऊलीने मुलासारखं समजलं तिचाच गळा दाबला

ओळखीचा फायदा घेत विश्वासघात करत अशोक कुमार याने आमच्याकडे अर्धा भरलेला गॅस सिलेंडर आहे. तो तुम्हाला हवा आहे का? अशी विचारणा रेशीम बन्सल यांना केली आणि काही सेकंदातच दोघांनी 72 वर्षीय वृद्ध रेशम यांचा गळा आवळत त्यांचा खून केला. तसंच घरातील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले दागिने तसंच रोकड एकूण 2 लाख 82 हजार रुपये घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.

दुपारच्या वेळेस जेवणाचा डबा आला नसल्याने पुरुषोत्तम बंसल हे जेवण्यासाठी घरी गेले असता खुनाचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, लोणावळा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींची फोटो तसंच माहिती मिळवली दोन्ही आरोपी राजस्थान येथील एरसना इथं असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 11:50 AM IST

ताज्या बातम्या