चिखलामुळे घसरला पाय, विहिरीत पडून 12 वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

चिखलामुळे घसरला पाय, विहिरीत पडून 12 वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

शेतातील विहिरीजवळ ती काम करत होती. चिखलामुळे पूजाचा पाय घसरला आणि ती थेट विहिरीत पडली.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 10 ऑक्टोबर: शेतातील काम करीत असताना अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने 12 वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पाचोड येथील अडुळतांडा येथे घडली आहे. पूजा बाबासाहेब राठोड (वय-17)असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की,पूजा दुपारी शेतात काम करण्यासाठी गेली होती. शेतातील विहिरीजवळ ती काम करत होती. चिखलामुळे पूजाचा पाय घसरला आणि ती थेट विहिरीत पडली. विहीर ही सुमारे 65 फूट खोल असून त्यात 50 फूटापेक्षा जास्त पाणी आहे. पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.

बराच वेळ झाला पूजा शेतात दिसत नसल्याने नातेवाईकांनी तिचा इतर ठिकाणी शोध घेतला. परंतु ती दिसली नाही. विहिरीच्या जवळ पाय घसरल्याच्या खुणा दिसल्याने नातेवाईकांनी विहिरीत डोकाऊन पाहिले असता पूजा मृतावस्थेत दिसली. गळ टाकून पूजाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पाचोड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलाने फाशी घेतल्याचा बनाव करणाऱ्या बापाला अटक

दुसरीकडे, औरंगाबाद शहरात मुलाने फाशी घेतल्याचा बनाव करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दीड वर्षांनंतर खुनाचा उलगडली आहे. तीस वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव बापाने केला होता.

राहुल अशोक जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुलचा गळा आवळून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी मृत राहुलचे वडील अशोक सदाशिव जाधव यांना पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

पार्किंगच्या मुद्यावरून सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण, घटनेचा CCTV VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2019 05:21 PM IST

ताज्या बातम्या