Parli Assembly Election : ‘लेक निघाली सासरला’, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

Parli Assembly Election : ‘लेक निघाली सासरला’, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

Marathwada Election Result 2019 Live Updates: पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल.

  • Share this:

परळी, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल भाजपसाठी परळी मतदारसंघ ठरला. या मतदार संघात मुंडे बहिण-भावाच्या लढाईत, धनंजय मुंडेंनी बाजी मारली. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना 1 लाख 21 हजार 186 मते तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना 90 हजार 418 मते मिळाली. धनंजय मुंडे यांचा 30 हजार 768 मतांनी विजय झाला.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर, तिसऱ्या फेरीपासून धनंजय मुंडे यांनी निर्णायक आघाडी मिळवली आणि आपला विजय खेचून आणला. याआधी 2014च्या विधानसभा निवडणूकीत 25 हजार मतांनी पंकजा यांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळी धनंजय मुंडेंनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार केला आणि त्याचे फळही त्यांना मिळाले. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभाही घेतल्या होत्या. मात्र अनुच्छेद 377 आणि कश्मीर मुद्द्यांवर भाजपनं दिलेला जोर मतदारांना विशेष काही भोवला नाही. तर दुसरीकडे धनंजय मुंडेच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले होते. पवारांनी आपल्या सभेत महाराष्ट्राच्या जनतेला साद घातली आणि जनतेनं पवारांच्या बाजूनं कौल दिला.

वाचा-जाणून घ्या पंकजा मुंडेंच्या पराभवाची 7 कारणे!

पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर, “लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद” अशी बोचरी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

वाचा-मराठवाड्यात मतदारांनी फिरवली दिग्गजांकडे पाठ, तरी युतीचे वर्चस्व कायम

निवडणूक प्रचारावेळी, “खणानारळाची ओटी भरून आता लेकीची सासरी पाठवणी करा”, असं आवाहन चाकणकर यांनी परळीकरांना केलं होतं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा विजय होताच चाकणकरांनी परळीकरांचे आभार मानले आहेत. याआधी त्यांनी माहेरच्या लोकांना आशिर्वाद द्या, त्यांना सुखानं सासरी नांदू द्या, असी खोचक टीका केली होती. तर एका युझरनं, लेक निघाली सासरला अशी कमेंट केली.

वाचा-औसामध्ये मुख्यमंत्र्यांचा 'अभिमन्यू' विजयी, विरोधकांना दिले सडेतोड उत्तर

जाणून घ्या पंकजा मुंडेंच्या पराभवाची ठळक कारणे-

-परळी नगरपरिषेदतमध्ये 2014नंतर धनंजय मुंडेमुळं राष्ट्रवादीनं निर्विवाद सत्ता मिळवली. धनंजय मुंडेंनी नागरी सुविधांवर सर्वात जास्त भर दिला. परळीतील पाण्याची समस्या सोडवली. मात्र या सर्व बाबतीत पंकजा मागे पडल्या.

-प्रचारादरम्यान पंकजा मुंडेना भोवळ आल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तब्बर 20 तासांनंतर त्या जनतेसमोर आल्या. यामुळं जनमानसात त्यांचा प्रभाव ऐन मतदानाच्या काळात कमी झालेला पाहायला मिळाला.

-पंकजा मुंडेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी ही व्हिडिओ क्लिप एडिट केली असल्याचं म्हटलं. दरम्यान, पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी मला काल जग सोडून जावं असं वाटत असल्याचं ते म्हणाले. यावेळी भावनिक झालेल्या धनंजय मुंडे यांना अश्रू रोखता आले नाहीत. यामुळं धनंजय मुंडेंना सहानुभूती मिळाली असावी.

-गेल्या पाच वर्ष सत्तेत असताना पंकजा मुंडे यांच्याकडे महिला आणि बालविकास कल्याण मंत्रीपद होते. यावेळी धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर चिक्की आणि शालेय पोषण आहार घोटाळा केल्याचे आरोप गाजले.

-भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी परळीत सभा घेतल्या होत्या. मात्र त्याचा परिणाम जनसामान्यांवर झाला नाही.

-धनंजय मुंडेच्या विजयामागे त्यांचा स्थानिक पातळीवर असलेला जनसंपर्क आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता प्रमुख कारण असू शकते.

-2014मध्ये पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडेच्या निधनानंतर आणि मोदी लाटेत मत मिळाली. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भावनिक साद लोकांपर्यंत पोहचली नाही.

First published: October 24, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading