Marathwada Election Result 2019 LIVE : भाजपनंतर शिवसेनेलाही मराठवाड्यात मोठा धक्का, आणखी एका मंत्र्याचा पराभव

Marathwada Election Result 2019 LIVE : भाजपनंतर शिवसेनेलाही मराठवाड्यात मोठा धक्का, आणखी एका मंत्र्याचा पराभव

Marathwada Election Result 2019 LIVE : मराठवाड्यात आणखी एका मंत्र्याचा पराभव.

  • Share this:

जालना, 24 ऑक्टोबर : मराठवाड्यामधून आणखी एक धक्कादायक पराभव समोर आला आहे. जालनामध्ये अर्जुन खोतकर आणि कैलास यांच्यात नेहमीच अटीतटीची लढत झाली आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा कॉंग्रसेच्या कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या आणखी एक मंत्र्याला आस्मान दाखवले.

1990 पूर्वी एक अपवाद वगळता हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळं कॉंग्रेसनं आपला बालेकिल्ला परत मिळवला असे म्हणायला हरकत नाही. 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हा पासून झालेल्या सलग सहा निवडणुकीत दोन वेळेस काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि चार वेळेस शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले. एवढेच नाही तर खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना हरवण्यासाठी तयारी दर्शवली होती. मात्र ऐनवेळी माघार घेतल्यामुळं त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले.

वाचा-जाणून घ्या पंकजा मुंडेंच्या पराभवाची 7 कारणे!

2014मध्येही खोतकरांचा निसटला विजय

2014 मध्ये चौरंगी लढतीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले होते. मात्र त्यावेळीही त्यांचे मताधिक्य केवळ 296 मतांचे एवढे कमी राहिले. खोतकर यांची जागा प्रतिष्ठेची असल्यामुळं त्यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा असू शकतो. तसेच, या निकालामुळं सेनेच्या आणखी एक मंत्र्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले.

वाचा-मंडळी! 1 लाख 63 हजार 176 ही फक्त एकूण मतं नाहीत, तर लीड आहे लीड

2014 जालना विधानसभा निवडणूक निकाल

अर्जुन खोतकर (शिवसेना) - 45078

कैलास गोरंट्याल (काँग्रेस) - 44782

अरविंद चव्हाण (भाजप)- 37591

अब्दुल रशीद (बसपा) - 36350

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 03:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading