Marathwada Election Result 2019 LIVE : औसामध्ये मुख्यमंत्र्यांचा 'अभिमन्यू' विजयी, विरोधकांना दिले सडेतोड उत्तर

Marathwada Election Result 2019 Live Updates: मुख्यमंत्र्यांचे सचिव अभिमन्यु पवार यांचा 24 हजार 811 मताधिक्याने विजय झाला.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 05:01 PM IST

Marathwada Election Result 2019 LIVE : औसामध्ये मुख्यमंत्र्यांचा 'अभिमन्यू' विजयी, विरोधकांना दिले सडेतोड उत्तर

लातूर, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 जागांचा आज निकाल लागला. यात मराठवाड्यातली आठ जिल्ह्यांमध्ये अनेक प्रतिष्ठेच्या लढाईत काही जागांवर युतीनं तर काही जागांवर आघाडीचे उमेदवार निवडणून आले. दरम्यान ज्या लढतीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते, त्या औसा मतदारसंघाची जागा भाजपनं मिळवली. मुख्यमंत्र्यांचे सचिव अभिमन्यु पवार यांचा 24 हजार 811 मताधिक्याने विजय झाला. त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा पराभव केला.

शिवसेनेच्या हक्काची जागा असलेला औसा मतदार संघातून अभिमन्यू प्रेमापोटी मुख्यमंत्र्यांनी ही भाजपच्या पदरात पाडून घेतली. या सगळ्या प्रकारानंतर भाजपमध्ये मोठी बंडखोरी देखील झाली. याशिवाय एका बंडखोरानं अपक्ष उमेदवारी दाखल करत संपूर्ण ताकद पणाला लावली. सध्या अभिमन्यू पवार 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

दुसरीकडं तब्बल दोनवेळा औसा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवणारे काँग्रेसचे बसवराज पाटील मुरूमकर यांनी देखील विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावली. त्यामुळं औसा मतदार संघात चुरशीची लढत यावेळी पाहायला मिळणार आहे. याआधी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी 2014 साली बसवराज पाटलांनी शिवसेनेच्या दिनकर मानेंचा पराभव केला होता.

अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला झाला होता विरोध

Loading...

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून अभिमन्यू पवार यांनी शिवसेनेकडून ही जागा हिसकावली. गेल्या 15 वर्षांपासून अभिमन्यू पवार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत आहेत. मात्र पवार यांच्या उमेदवारीला भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी विरोध केला होता. अरविंद पाटील हे राज्याचे कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे भाऊ आहेत. शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांचाही अभिमन्यू पवारांच्या उमेदवारीला विरोध होता. युतीच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार औसा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात असायचा. त्यामुळे यंदा ही जागा भाजपला गेल्यानंतर स्थानिक शिवसैनिक नाराजी होती.

बसवराज पाटील यांची हॅट्रिक मुकली

2014च्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला 8858 मतांनी हरवले होते. त्यामुळं 2019मध्ये सध्या बसवराज पाटील हॅट्रिकवर होते. मात्र औसामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेत कॉंग्रेसला दणका दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...