Marathwada Election Result 2019 LIVE : देशमुख घराण्याच्या धाकट्या चिरंजीवानं राखला गड!

Marathwada Election Result 2019 Live Updates: दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धिरज देशमुख 1 लाख 19 हजार 826 मताधिक्यानं विजयी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 07:07 PM IST

Marathwada Election Result 2019 LIVE : देशमुख घराण्याच्या धाकट्या चिरंजीवानं राखला गड!

लातूर, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 जागांचा आज निकाल लागला. यात मराठवाड्यातली आठ जिल्ह्यांमध्ये अनेक प्रतिष्ठेच्या लढाईत काही जागांवर युतीनं तर काही जागांवर आघाडीचे उमेदवार निवडणून आले. दरम्यान ज्या लढतीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते, लातूरमध्ये देशमुखं घराणं गड राखणार की नाही यावर. दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र धिरज देशमुख 1 लाख 19 हजार 826 मताधिक्यानं विजयी झाले आहेत.

लातूर ग्रामीण हा लातूर तालुक्यातलाच 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालेला मतदारसंघ. याआधी शिवराज पाटील आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांच्यामुळं या लातूरवर कायमच कॉंग्रसचे वर्चस्व राहिले आहे. आता याच लातुरच्या ग्रामीण मतदारसंघातून दिवंगत विलासरावांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज देशमुख आता विधानसभेत जाण्यास सज्ज झाले आहेत. याआधी त्यांनी याच भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

विद्यमान आमदर त्र्यंबक भिसे यांनी 2014मध्ये भाजपच्या रमेश कराड यांना अटीतटीची लढत देत ही जागा आपल्या नावावर केली होती. त्यामुळं आता कॉंग्रेसचा बालेकिल्ला देशमुख कुटुंबियांनी आपल्या नावावर केला. धीरज यांनी ग्रामीणमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवली.

लातूर शहर विधानसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असली तरी, यात धिरज पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळं त्यांनी 1 लाखांच्या लीडनं ही जागा मिळवली. मुख्य म्हणजे धिरजच्या प्रचारासाठी सिनेअभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मोठ्या उत्साहाने केला होता. दरम्यान, दुसरीकडे अचानक हा मतदार संघ भाजपकडून शिवसेनेकडं गेल्याने ऐनवेळी शिवसेनेकडून रामदेव बाबा यांनी सुचवलेला उमेदवार सचिन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. मतदार संघात पूर्णपणे अनोळखी असलेला हा चेहरा प्रचारात कुठेच दिसला नाही शिवाय रामदेव बाबा यांनी देखील तीन दिवसांचा मुक्कामी कार्यक्रम जाहीर करूनही आयत्यावेळी तो कार्यक्रम रद्द केला. त्याचा फटका शिवसेनेला बसला.

Loading...

नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते

लातूर ग्रामीण मतदारसंघात धिरज देशमुख आघाडीवर असले तरी येथे त्यांना कोणताही उमेदवार नाही तर नोटा टक्कर देत आहे. या मतदारसंघात तब्बल 7 हजार 619 मतदारांनी 'नोटा'चं (None of the Above) बटण दाबलं आहे. विशेष म्हणजे, ही दुसऱ्या क्रमांकाची मते आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...