Parli Election Result 2019 : जाणून घ्या पंकजा मुंडेंच्या पराभवाची 7 कारणे!

Marathwada Election Result 2019 LIVE : तिसऱ्या फेरीपासून धनंजय मुंडे यांनी निर्णायक आघाडी मिळवली आणि आपला विजय खेचून आणला.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 03:09 PM IST

Parli Election Result 2019 : जाणून घ्या पंकजा मुंडेंच्या पराभवाची 7 कारणे!

परळी, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतला सर्वात चुरसीशी लढत म्हणून परळी मतदार संघातील मुंडे भाऊ-बहिण यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र तिसऱ्या फेरीपासून धनंजय मुंडे यांनी निर्णायक आघाडी मिळवली आणि आपला विजय खेचून आणला. खरतर पंकजा मुंडेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळीमध्ये धनंजय यांनी आपल्या बहिणाला पराभवाचा धक्का दिला.

याआधी 2014च्या विधानसभा निवडणूकीत 25 हजार मतांनी पंकजा यांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळी धनंजय मुंडेंनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार केला आणि त्याचे फळही त्यांना मिळाले. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभाही घेतल्या होत्या. मात्र अनुच्छेद 377 आणि कश्मीर मुद्द्यांवर भाजपनं दिलेला जोर मतदारांना विशेष काही भोवला नाही. तर दुसरीकडे धनंजय मुंडेच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले होते. पवारांनी आपल्या सभेत महाराष्ट्राच्या जनतेला साद घातली आणि जनतेनं पवारांच्या बाजूनं कौल दिला.

वाचा-Parli Election Result 2019: पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

पंकजा आणि धनंजय यांची लढत ही प्रचारांमध्ये एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळं चांगलीच गाजली. पंकजा यांनी धनंजय यांच्यावर केलेले खालच्या दर्जाचे आरोप आणि धनंजय यांची व्हायरल झालेली क्लिप यासगळ्यामुळं ही लढत हायवोल्टेज झाली होती. मात्र पंकजा मुंडेच्या पराभवा मागे सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे जनसंपर्काचा अभाव.

वाचा-विजयानंतर धनंजय मुंडेंचे फक्त 'दोन शब्द', परळीत पंकजा मुंडेंना धक्का!

Loading...

जाणून घ्या पंकजा मुंडेंच्या पराभवाची ठळक कारणे-

-परळी नगरपरिषेदतमध्ये 2014नंतर धनंजय मुंडेमुळं राष्ट्रवादीनं निर्विवाद सत्ता मिळवली. धनंजय मुंडेंनी नागरी सुविधांवर सर्वात जास्त भर दिला. परळीतील पाण्याची समस्या सोडवली. मात्र या सर्व बाबतीत पंकजा मागे पडल्या.

-प्रचारादरम्यान पंकजा मुंडेना भोवळ आल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तब्बर 20 तासांनंतर त्या जनतेसमोर आल्या. यामुळं जनमानसात त्यांचा प्रभाव ऐन मतदानाच्या काळात कमी झालेला पाहायला मिळाला.

-पंकजा मुंडेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी ही व्हिडिओ क्लिप एडिट केली असल्याचं म्हटलं. दरम्यान, पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी मला काल जग सोडून जावं असं वाटत असल्याचं ते म्हणाले. यावेळी भावनिक झालेल्या धनंजय मुंडे यांना अश्रू रोखता आले नाहीत. यामुळं धनंजय मुंडेंना सहानुभूती मिळाली असावी.

-गेल्या पाच वर्ष सत्तेत असताना पंकजा मुंडे यांच्याकडे महिला आणि बालविकास कल्याण मंत्रीपद होते. यावेळी धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर चिक्की आणि शालेय पोषण आहार घोटाळा केल्याचे आरोप गाजले.

-भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी परळीत सभा घेतल्या होत्या. मात्र त्याचा परिणाम जनसामान्यांवर झाला नाही.

-धनंजय मुंडेच्या विजयामागे त्यांचा स्थानिक पातळीवर असलेला जनसंपर्क आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता प्रमुख कारण असू शकते.

-2014मध्ये पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडेच्या निधनानंतर आणि मोदी लाटेत मत मिळाली. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भावनिक साद लोकांपर्यंत पोहचली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...