साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, बुवाबाजीच्या मुद्द्यावरून परिसंवाद पाडला बंद

साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, बुवाबाजीच्या मुद्द्यावरून परिसंवाद पाडला बंद

उस्मानाबादमध्ये संत गोरा कुंभार साहित्य नगरीत उभारलेल्या साहित्य संमेलनाच्या मंचावर एका परिसंवादात वाद निर्माण झाला. 'समाजात बुवाबाजीचं प्रस्थ वाढतंय का?' या विषयावर हा परिसंवाद होता...

  • Share this:

उस्मानाबाद, 11 जानेवारी : उस्मानाबादमध्ये संत गोरा कुंभार साहित्य नगरीत उभारलेल्या साहित्य संमेलनाच्या मंचावर एका परिसंवादात वाद निर्माण झाला. 'समाजात बुवाबाजीचं प्रस्थ वाढतंय का?' या विषयावर हा परिसंवाद होता. परिसंवाद सुरू असताना धर्माच्या मुद्द्यावरून वाद झाला. या विषयावर चर्चा सुरू असताना काहीजण स्टेजवर आले आणि त्यांनी, तुम्ही नेहमी हिंदू धर्मातल्या प्रथा आणि अंधश्रद्धांवरच का बोलता, असे सवाल विचारत मंचावर गोंधळ घातला आणि परिसंवाद बंद पाडला. नंतर मात्र हा परिसंवाद पुन्हा सुरू झाला. हा गोंधळ घालणाऱ्या लोकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे.

फादर दिब्रिटोंना विरोध

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्रण संघटना आधीपासूनच विरोध करत होत्या. संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांनाही धमक्या देण्यात आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या परिसंवादात हा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. हा गोंधळ मिटल्यानंतर परिसंवाद पुन्हा सुरू झाला पण यावेळी मंचावर पुरेशी सुरक्षाव्यवस्था नव्हती. खाजगी सुरक्षारक्षकांनी आणि संयोजन समितीच्या सदस्यांनी स्टेजवर घुसलेल्या लोकांना खाली खेचलं आणि मग परिसंवाद सुरू करता आला.

(हेही वाचा : 'सरकारने आदेश दिला तर POK बद्दल योग्य कारवाई करू',मनोज नरवणेंचं वक्तव्य)

पत्रकबाजी आणि वाद सुरूच

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या धर्माच्या अनुषंगाने आणि त्यांच्या लेखन व्यवहाराबद्दल काही उत्तरं द्यावीत, अशी काही जणांची मागणी होती. त्यावरून संमेलनात वाद निर्माण होण्याची चिन्हं होतीच आणि तसंच घडलं. उस्मानाबादमधल्या साहित्य संमेलनाचा उद्या समारोप होतोय. त्याआधीच फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे तब्येत बरी नसल्यामुळे मुंबईला परतले आहेत. पण साहित्य संमेलनातले वाद काही मिटलेले नाहीत हेच या गोंधळावरून दिसून आलं.

===========================================================================================

First Published: Jan 11, 2020 06:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading