मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'बायको देता का बायको..' सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकास बेदम मारहाण

'बायको देता का बायको..' सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकास बेदम मारहाण

'बायको देता का बायको!' या मराठी सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकावर अज्ञात तरुणांनी अचानक जीवघेणा हल्ला केला.

'बायको देता का बायको!' या मराठी सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकावर अज्ञात तरुणांनी अचानक जीवघेणा हल्ला केला.

'बायको देता का बायको!' या मराठी सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकावर अज्ञात तरुणांनी अचानक जीवघेणा हल्ला केला.

बीड,22 फेब्रुवारी:'बायको देता का बायको!' या मराठी सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकावर अज्ञात तरुणांनी अचानक जीवघेणा हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिनेता सुरेश ठाणगे व दिग्दर्शक धनंजय यमपुरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीड येथील आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात शनिवारी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने प्रसंगावधान राखल्याने ती थोडक्याच बचावली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीड येथील आशा सिनेफ्लेक्स 'बायको देता का बायको!' सिनेमाचा शो सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांसोबत धम्माल करण्यासाठी सिनेमाचे अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक आले होते. या दरम्यान, सिनेमागृहाच्या आवारात अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामध्ये चित्रपट अभिनेते सुरेश ठाणगे व निर्माते धनंजय यमपुरे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने बचावासाठी तेथून बळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. हल्लेखोरांनी आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात फर्निचरची तोडफोडही केल्याची माहिती मिळाली आहे.

'विवाह' हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. उपवर झालेल्या प्रत्येक तरुणाला आपलंही लवकर लग्न व्हावं असं वाटत असतं. आपल्याला सुंदर व सुशील बायको मिळावी आणि आपली जोडी चारचौघात उठून दिसावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. याच भावनेतून बायकोच्या शोधात निघालेल्या तरुणांची कथा सांगणारा 'बायको देता का बायको' या मराठी सिनेमाची थिम आहे.

हेही वाचा..

'मी माझे शब्द मागे घेतो', वादाच्या 48 तासानंतर अखेर वारीस पठाण नमले

बारावीचा पेपर सुरू असताना WhatsApp वर फोडली प्रश्नपत्रिका, दोन शिक्षक ताब्यात

धनगर आरक्षण पुन्हा पेटणार, थेट मुख्यंमत्र्याच्या घरात मेंढरं सोडण्याची धमकी

First published:
top videos