राज्यात मराठी सक्तीचं असताना रेल्वेला अजूनही मातृभाषेचं वावडं

राज्यात मराठी सक्तीचं असताना रेल्वेला अजूनही मातृभाषेचं वावडं

अजूनही रेल्वेमध्ये मराठी पाट्या नाही, मग रेल्वेला कोणत्या भाषेत सांगितलं म्हणजे कळेल?

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी: राज्यभरात आता मराठी भाषा सक्तीची केली जावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत. याच धर्तीवर सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो ट्रेनमधील असल्याचं दिसत आहे. मात्र कोणती ट्रेन आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. मराठी सक्तीची करण्याच्या पार्श्वभूमीवर हे फोटो व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पहिल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की या लोकलमध्ये लावण्यात आलेल्या पाटीवर फक्त इंग्रजी आणि हिंदी दोनच भाषांमध्ये सूचना लिहिण्यात आली होती. त्यावर कोणीतरी 'इथे मराठी हवीच' असा स्टीकर चिकटवला आहे. महाराष्ट्रात वाढत चालेला गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेचं प्रमाण आणि त्यामुळे मराठी भाषा ही मागे पडत चालल्यानं पुन्हा एकदा मराठी भाषा सर्व ठिकाणी सक्तीची करण्याचा जोर मनसेसह नागरिकांकडूनही केला जात आहे. त्यानंतर आता दुसरा फोटो त्यासोबत जो व्हायरल झाला आहे तो पाहू शकता. प्रवाशांच्या मागणीनंतर आणि अशा पद्धतीनं सूचना लिहिल्यानंतर रेल्वे प्रशसासनानं त्या सूचना फलकाच्या वर मराठी भाषेतून सूचना लावली आहे. हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशी धावणारी देशातील दुसरी प्रायव्हेट ट्रेन तेजस एक्सप्रेसमध्ये ट्रेनच्या नावाच्या पाटीवर एकीकडे केवळ हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेला स्थान देण्यात आल्यानं काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी मराठी भाषेची पाटी नसल्यानं हा वाद उफाळला होता.

राज्यात राहणाऱ्या सर्वांना मराठी भाषा आलीच पाहिजे. त्यांनी मराठी बोलणं, शिकणं आणि वाचनं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यातल्या सर्व शाळांना पहिली ते दहावी मराठी सक्तिची केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. शाळा कुठलीही असो त्यांना मराठी आलंच पाहिजे. काही मुलं जास्त गुण मिळविण्यासाठी इतर विषय घेतात. पण केवळ गुणांकडे बघू नका,आपली मातृभाषणं उत्तम पद्धतीनं येणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. तर आता महापालिका आणि सरकारी कामकाजही मराठीमधून करण्यावर ठाकरे सरकारचा भर असणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे हाराष्ट्रात राहताय ना? मग मराठी यायला हवं. नसेल येत तर शिका, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

हेही वाचा-आता रात्रीही करा Enjoy, मुंबईत आजपासून नाईट लाईफ सुरू

हेही वाचा-थंडी अभी बाकी है! येत्या आठवड्यात पुन्हा थंडीचे आगमन

First published: January 27, 2020, 9:55 AM IST

ताज्या बातम्या