मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /प्रसिद्ध गायिका वैशाली माडे हाताला बांधणार राष्ट्रवादीचं घड्याळ; मराठी बिग बॉसमुळे आल्या चर्चेत

प्रसिद्ध गायिका वैशाली माडे हाताला बांधणार राष्ट्रवादीचं घड्याळ; मराठी बिग बॉसमुळे आल्या चर्चेत

मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे (Singer Vaishali Made) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार (Will join NCP) असल्याची चर्चा रंगली आहे. अलीकडेच त्या मराठी बिग बॉसमुळे (Marathi Big Boss fem) चर्चेत आल्या होत्या.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 मार्च: सध्या चित्रपट विश्वातील अनेक कलाकार राजकीय क्षेत्रात उतरत आहेत. अलीकडेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West bengal Assembly election) पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीने (Mithun Chakraborty) भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे (Singer Vaishali Made) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार (Will join NCP) असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबतची माहिती चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. पक्ष प्रवेश झाल्यानंतर वैशाली माडे यांच्याकडे पक्षातील कोणती जबाबदारी दिली जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, लोकप्रिय गायिका वैशाली माडे यांचा 31 मार्च रोजी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेतेही उपस्थित राहणार असून दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

गायिका वैशाली माडे अलीकडेच मराठी बिग बॉसमुळे चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातमीमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. वैशाली माडे यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तसेच विविध मराठी मालिकांच्या 'टायटल साँग'लाही त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजातील टायटल साँग आजही अनेक दर्शकांच्या जीभेवर रेंगाळतात.

हे ही वाचा - शिरूरचे आजी-माजी खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार? व्हायरल बातमीनंतर मतदारसंघात गोंधळ

गायिका वैशाली माडे या मुळच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील रहिवासी आहेत. त्यांचे महाराष्ट्रात असंख्य चाहते आहेत. त्यांनी 'झी' वाहिनीच्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतील गायन स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. त्यानंतर मराठी चित्रपट विश्वात त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. त्यांनी आता राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवली जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: NCP, Sharad pawar