मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठी अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरण, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मराठी अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरण, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मराठी अभिनेत्री मानसी नाईकसोबत पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात छेडछाड झाली होती

मराठी अभिनेत्री मानसी नाईकसोबत पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात छेडछाड झाली होती

मराठी अभिनेत्री मानसी नाईकसोबत पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात छेडछाड झाली होती

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई,8 फेब्रुवारी: मराठी अभिनेत्री मानसी नाईकसोबत पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात छेडछाड झाली होती. आता या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसी नाईक 5 फेब्रुवारीला पुण्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्याचा युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केले. त्याने मंचाजवळ जाऊन मानसीला धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप खुद्द मानसीने केला आहे. याप्रकरणी मानसीने साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन साकीनाका पोलिसांनी तपासासाठी हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केले आहे. याशिवाय याप्रकरणी तीन जणांविरोधात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली आहे. भयंकर घडलं, मानसीने सांगितला अंगावर शहारे आणणारा प्रसंग मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिच्यासोबत घडलेला प्रकाराचा थरारक अनुभव सांगितला. युवासेनेच्या जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री मानसी नाईक 5 फेब्रुवारी (गुरुवार) पुण्यातील शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव इथं एका कार्यक्रमात परफॉर्मन्स करण्यासाठी पोहोचली होती. या कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने मानसीसोबत गैरवर्तन केले. मानसी म्हणाली, रांजणगाव येथे मी कार्यक्रमाला गेली होती. डॉ. संतोष पोटे आणि त्यांची पत्नी डॉ. सुनीता पोटे यांच्यातर्फे मला या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. त्यावेळी डॉ. संतोष पोटे आणि डॉ. सुनीता पोटे आणि माझ्याशी गैरवर्तन करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला होता त्यावर संताप व्यक्त करून प्रतिकार केला होता. त्यानंतर कुठेही बोलू नये, म्हणून माझ्यावर दबाबही टाकला होता. एवढंच नाहीतर मी जेव्हा तिथून निघाली होती. माझी गाडीही अडवण्यात आली होती. अनेक गाड्यांमध्ये माझी गाडी अडवण्यात आली होती. मी आरडाओरडा केल्यानंतर मला तिथून बाहेर पडता आलं, असे मानसीने सांगितले. आईला फोन करून मला ठार मारण्याची दिली धमकी 'त्या ठिकाणाहुन कशी बशी सुटका करून मी मुंबईला आली. पण त्यानंतर आणखी एक भयंकर प्रकार घडला. माझ्या आई आणि वडिलांचा फोन नंबर पोटे यांच्याकडे होता. त्यांनी माझ्या आई-वडिलांना फोन करून खालच्या भाषेत संभाषण केले. माझ्या आईशी बोलताना मला ठार मारून रांजणगावामध्ये मृतदेह फेकून देऊ, अशी धमकी देण्यात आली. एवढेच नाहीतर तुमच्या मुलीचे व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केले आहे. ते व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू अशीही धमकी दिली होती. या प्रकारामुळे माझ्या आईला प्रचंड त्रास झाला', असेही मानसीने सांगितले.
First published:

पुढील बातम्या