ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन

वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

  • Share this:

पुणे, ०९ नोव्हेंबर २०१८- ज्येष्ठ नाट्यकर्मी लालन सारंग यांचं पुण्यात निधन झालं. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्याच्या जोशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सखाराम बाईंडर, रथचक्र आणि कमला आरोप

उद्याचा संसार, उंबरठ्यावर माप ठेविले, खोल खोल पाणी, गिधाडे, घरकुल ही त्यांची काही गाजलेली नाटकं आहेत. त्यातही सखाराम बाईंडर नाटकातील त्यांची चंपा ही भूमिका आजही नाट्यप्रेमी विसरलेला नाही. आपल्या अभिनयाने अक्षरशः नाट्यगृह दणाणून सोडणाऱ्या लालन सारंग यांच्या निधनाने नाट्यसृष्टीत शोककळा पसरली आहे

First published: November 9, 2018, 9:24 AM IST

ताज्या बातम्या