Home /News /maharashtra /

मराठी अभिनेत्रीची 6 डिसेंबरबाबत आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी दाखल केली तक्रार

मराठी अभिनेत्रीची 6 डिसेंबरबाबत आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी दाखल केली तक्रार

फेसबूक पोस्टमध्ये केतकीने लिहिलेल्या एका वाक्यावर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.

    मुंबई, 2 मार्च : 'आम्ही फक्त हिंदू असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,' असं म्हणत अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र याच पोस्टमध्ये केतकीने लिहिलेल्या एका वाक्यावर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. 'नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क,' असं आक्षेपार्ह वाक्य अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यावर आक्षेप घेत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी भांडूप पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दिली आहे. तसंच लवकरात लवकर तिने माफी मागत ही पोस्ट डिलीट करावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दिवशी राज्यभरातील दलित बांधव बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येत असतात. मात्र याविषयीच आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळेवर टीका होते आहे. हेही वाचा- इंदोरीकर महाराजांचा पाय आणखी खोलात, अडचणी वाढण्याची शक्यता काय आहे केतकी चितळेची फेसबूक पोस्ट? "आपल्या देशात, √ तुम्ही बुरख्यात राहिलात, मुसलमान आहोत हे दाखवून देणारी टोपी घातलीत तर ते धर्म स्वातंत्र आहे. √ किरपान (एक छोटा चाकू) सिखानी ठेवला, तर ते धर्मात लिहीलय. √ आम्ही कंदमूळ खाणार नाही, म्हणून जैन मेनू वेगळा असतो, ते धर्म पालन. √ अग्नी मंदिर फक्त आमचे प्रार्थना स्थान आहे, दुसऱ्याना परवानगी नाही त्याच्याजवळ यायची, असं म्हणत पारसी आपला धर्म जपतात. √ चर्च मधील फादर, फक्त यशु बद्दल नव्हे तर राजकारण आणि बाकी धर्म (एक टारगेट धर्म, समजून घ्या कुठला) कसे वाईट, यावर भाष्य करतात, पण ते त्यांचं सरमन म्हंटलं जातं. √ नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो. ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की 'मुसलमान, क्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू' असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय. जागे व्हा जरा. मी सर्वप्रथम एक भारतीय आहे, मी हिंदू विचारसरणीचे पालन करते. मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे," असं केतकी चितळेनं आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Facebook post, Marathi acteress

    पुढील बातम्या