रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू!

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू!

मराठी चित्रपटातील अभिनेत्री आणि तिच्या नवजात बाळाचा रविवारी मृत्यू झाला.

  • Share this:

हिंगोली, 22 ऑक्टोबर: राज्यातल्या ग्रामीण भागातील आरोग्य स्थिती किती भयानक आणि गंभीर आहे हे सांगणारी धक्कादायक घटना घडली आहे. मराठी चित्रपटातील अभिनेत्री (Marathi Actress Dies) आणि तिच्या नवजात बाळाचा रविवारी मृत्यू झाला. 25 वर्षीय अभिनेत्री पूजा जुंजर (Pooja Zunjar)आणि तिच्या नवजात बाळाचा रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाला. जर वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर पूजा आणि बाळाचा जीव वाचला असता असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ही घटना घडली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी मतदारांना अनेक आश्वासने दिली. सत्ताधारी पक्षाकडून चांगल्या आरोग्य सेवा दिल्याचा दावा देखील केला गेला. पण प्रत्यक्षात राज्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवेची गुणवत्ता कशी आहे याचे भीषण चित्र हिंगोली(Hingoli)तील सेनगाव तालुक्यातील या घटनेमुळे समोर आले आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर पूजाची प्रकृती बिघडली. पुढील उपचारासाठी दिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते पण यासाठी रुग्णवाहिकाच उशिरा आल्याने पूजाचा मृत्यू झाला. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30च्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील एका प्राथिमक आरोग्य केंद्रात पूजाने बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर केंद्रातील डॉक्टरांनी तिला हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालय गोरेगावपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पूजाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेची शोधा शोध सुरु केली. अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेर हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी एक खासगी रुग्णवाहिका मिळाली. पण तोपर्यंत पूजाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद करून घेतली आहे आणि पूजाच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे. पूजाने दोन मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या आहेत.बाळंतपणासाठी पूजाने काही दिवसांपासून सुट्टी घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 12:41 PM IST

ताज्या बातम्या