बिकिनीवर जबरदस्तीने फोटोशूट, छेडछाडप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

मंदार कुलकर्णी हा जबरदस्तीने बिकिनीवर शूट करायला लावत होता, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 09:53 PM IST

बिकिनीवर जबरदस्तीने फोटोशूट, छेडछाडप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

पुणे, 27 ऑगस्ट : अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीप्रकरणी प्रसिध्द नाट्यकर्मी मंदार कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. मंदार कुलकर्णी हा जबरदस्तीने बिकिनीवर शूट करायला लावत होता, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.

नाटकात काम करण्यासाठी संबंधित तरुणी पुण्यात आली होती. ऑडिशनसाठी फोटोशूट करावं लागेल, असं सांगत मंदार कुलकर्णी याने त्या तरुणीला बोलावून घेतलं. त्यानंतर सुरुवातीला वन पीसमध्ये फोटो काढून झाल्यानंतर मंदार कुलकर्णीने त्या तरुणीला बिकिनीत फोटो काढायला सांगितले. मी अशा कपड्यांत फोटो काढायची मला सवय नाही, असं त्या मुलीने मंदारला सांगितलं. पण मुलीचा विरोध असतानाही मंदार कुलकर्णीने त्या मुलीकडून फोटोशूट करून घेतलं, असा पीडित तरूणीचा आरोप आहे.

'आरोपीने आपल्याला कपडे काढायला सांगून पाठीचे उघडे फोटो जबरदस्तीने काढून घेतले. यानंतर मी कपडे घालत असनाच आरोपीने मला बोलवून कपड्याचे माप घेतले. शेवटी माझ्याकडून असे फोटोशूट करून घेतले हे घरी सांगू नकोस असंही त्याने बजावलं,' अशी तक्रार पीडित तरुणीने दाखल केली आहे.

कोण आहे मंदार कुलकर्णी?

- 'पक्के शेजारी' या मालिकेत काम

Loading...

- 'लग्नबंबाळ' हे व्यावसायिक नाटक

- पुण्यात नाट्यशिबीरं घेतली

- पुण्याच्या पीडीए नाट्यसंस्थेत कार्यरत

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 10:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...