UPSC ची तयारी करणारे मराठा तरुण अडचणीत, शिष्यवृत्तीचा पत्ताच नाही

UPSC ची तयारी करणारे मराठा तरुण अडचणीत, शिष्यवृत्तीचा पत्ताच नाही

सारथी संस्थेकडून देण्यात येणारी शिष्यवृती गेल्या महिनाभरापासून मिळालेली नाही. त्यामुळे युपीएससीची तयारी करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी - मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावं यासाठी सारथी ही संस्था मदत करत असते. सारथी संस्थेची परीक्षा उत्तीर्ण करून जवळपास 225 विद्यार्थी दिल्लीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. पण अचानक या विद्यार्थ्यांची गेल्या महिन्यापासून शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. गेले काही महिने व्यवस्थितपणे येणारी शिष्यवृत्ती अचानक का थांबली याचं उत्तर कोणाकडेही नाही. त्यामुळे हे सर्व मराठा समाजाचे विद्यार्थी विवंचनेत आहेत. हे सगळे विद्यार्थी राजकीय नेत्यांची भेट घेऊन आपली अडचण मांडत आहेत. पण अजूनही मार्ग निघाला नाही.

सारथी योजनेअंतर्गत मिळणारी मागासवर्ग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असून राजधानी दिल्लीतील 225 विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आयएएस, (IAS) आईपीएसच्या (IPS) तयारीसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला शिष्यवृत्ती मिळत होती. मात्र फेब्रुवारीची 13 तारीख ओलांडली तरी अजूनही शिष्यवृत्तीचा पत्ता नाही. विदयार्थी यामुळे चिंतातुर झाले असून राज्य सरकारने लवकर दिलास द्यावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. राजधानी दिल्लीतील खर्च बघता जर या महिन्यात पैसे मिळाले नाही तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत यावं लागेल. यामध्ये अनेक मराठा समाजातील तरुणी असून ज्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नासाठी दिल्लीत आलेल्या आहेत. मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा या सारथी संस्थेअंतर्गत या योजनेत गुणवत्तेच्या आधारावर समावेश होतो. पण आता विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. घराचं भाडं, ग्रंथालयाचं शुल्क, जेवणाचे पैसे हे सगळे थकले आहेत. आतापर्यंत हे विद्यार्थी उधार मागून कसातरी वेळ मारून नेत आहेत. पण आता घरमालकांनी शेवटचा इशारा दिला आहे.

त्यामुळे शिष्यवृत्तीचे पैसे लवकर मिळावे. सोबतच एका निश्चित तारखेला पैसे मिळण्याची सुविधा असावी असं आश्वासन सरकारने द्यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. जर या मागणीकडे दुर्लक्ष झालं तर सर्व विद्यार्थी महाराष्ट्र सदनासमोर धरणं आंदोलन करतील असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका शेवटाकडे, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर

इंदुरीकर महाराजांवर तृप्ती देसाई भडकली, पोलीस प्रशासनालाच दिलं चॅलेंज!

First published: February 13, 2020, 8:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading